दगडखाणींच्या प्रदूषणाने मुरम्यातील नागरिक त्रस्त;
"मुरमा शिवारातील सलिम खडी क्रेशरकडून शासनाचे नियम धाब्यावर बसवून बेसुमार दगड उत्खनन"
पाचोड(विजय चिडे) पैठण तालुक्यातील मुरमा शिवारातील दगडखाणीतून दररोज दगडाची उत्खनन करीत आहे.या यामुळे परिसरातील नागरिकांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत असताना यामध्ये मुरमा शिवाराती सलिम खडी स्टोन क्रेशर कडून दररोज लाखो रूपयांचे दगड उत्खनन करत असून दररोज खडी दळल्या जात असल्यामुळे धूळ पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सलिम खडी क्रेशर हे रस्तालगतच असल्यामुळे रात्रीच्या सुमारास तर या परिसरात प्रचंड धुळीचे ढग तयार होतात, कधी कधी तर यामुळे समोरचा माणूस दिसत नाही, ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे या परिसरात प्रचंड प्रदूषण होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या परिसरात उघडय़ावर काम करणाऱ्या कामगारांच्या तर रोज मूठभर तरी धुरळा पोटात जात असण्याची शक्यता आहे.
महसूल विभागाच्या आशीर्वादाने शासनाचे नियम धाब्यावर बसवून दिवसरात्र या भागात क्रशर आणि बेसुमार दगडांचे उत्खनन सुरू असून यामुळे उडणाऱ्या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.या परिसरात दगड माफियांची प्रचंड मुजोरी आहे. त्यामुळे ते कोणालाही जुमानत नाहीत.सलिम स्टोन क्रेशर दररोज खदानीतून लाखो रूपयांचे गौण खनिजाचे उत्खनन करून पर्यावरणाचे अतोनात नुकसान या दगड माफियांनी केले आहे.
या परिसरात अनेक क्रशर आणि दगडखाणी या अनधिकृत असून त्यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाची परवानग्या नसल्याचे सांगण्यात येत आहे. या परिसरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात नियमबाह्य दगडांचे उत्खनन करण्यात आले असून येथे एक प्रचंड आकाराचे सरोवर तयार झाले आहे. दगडांचे किती खोलीपर्यंत उत्खनन करावे यासाठी शासनाने नियम घालून दिलेले असताना ते नियम सर्रास पायदळी तुडविले जात आहेत.