अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात विधान. परिषदेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच आपल्या सहकाऱ्यासॊबत श्री स्वामी समर्थ मंदिरास भेट देऊन श्री स्वामीचे दर्शन घेतले .
यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमदार पडळकर व सहकारी यांचा श्री स्वामी समर्थ्यांचे कृपावस्त्र देऊन सन्मान केला. यावेळी स्वामीनाथ लोणारी, महेश गोगी, संजय पवार आदी उपस्थित होते.