शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप यादव यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे . यादव हे सन २०१० मध्ये पोलीस खात्यात पीएसआय म्हणून दाखल झाले होते . ते सातारा जिल्ह्यात त्यांचे मूळ गाव आहे . यापूर्वी त्यांनी पुणे शहर व गडचिरोली येथे काम केलेले आहे . सन २०१४ ला त्यांची सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली होती . मागील काही वर्षापासून ते शिरुर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून काम करीत आहे . कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय पोलीस आधिकारी म्हणून यादव यांची ओळख आहे . पोलीस निरीक्षकपदी झालेल्या पदोन्नती बद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे .

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |