शिरुर ( वार्ताहर ) जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मिडीयम स्कूल शिरूर येथील शाळेचा मैदानात ४०० देशी झाडे पावसाळात लावण्यात येणार असून या उपक्रमाचा शुभारंभ जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वृक्षारोपण करुन करण्यात आला . या वेळी शाळेचे प्राचार्य डॉ समीर ओंकार, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या वतीने या वर्षी पावसाळ्यात शाळेच्या चार एकर मैदानावर 400 देशी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना कार्यानुभव प्रशिक्षण म्हणून परसबाग व फुलांची नर्सरी उभारण्यात येणार असल्याचे ओंकार यांनी सांगितले . जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्री देवराई शिरूर या ठिकाणी वृक्षप्रेमी यांनी एकत्र येऊन विविध देशी रोपांचे वृक्षारोपण केले . यावेळी ईश्वरीय ब्रह्मकुमारी प्रजापिता विश्वविद्यालयाच्या प्रमुख बी के अर्चना बहेनजी ,शंकुतला बहेनजी , महिबुब सय्यद, अनिल बांडे रवींद्र सानप, प्रा .चंद्रकांत धापटे , प्रा . व्ही . एच . पाटील , डॉ . समीर ओंकार ,बाजार समितीचे माजी सचिव दिलिप मैड , बाळासाहेब आवारी ,ॲड . आदित्य मैड , रवि लेंडे , राहुल निकुम , नंदकुमार पिंजरकर , सचिन खामकर , आदी उपस्थित होते . सह्याद्री देवराई येथे लोकसहभागातून देशी फळझडांचे बन उभारण्यात येत आहे .