बीडमध्ये ६३ हजार रुपयांची घरफोडी

बीड : नातेवाईकांकडे गेलेल्या महिलेचे बंद घर फोडून चोरट्यांनी भरदिवसा ६२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला . ही घटना शहरातील जुनाबाजार परिसरातील हाफिज गल्लीत २ ऑगस्ट रोजी घडली . ६ ऑगस्ट रोजी शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला . जुना बाजार परिसरातील हाफिज गल्लीत सय्यद फरजाना सय्यद जहीर या वास्तव्यास आहेत . २ ऑगस्ट रोजी त्या नणंदेच्या मुलाला भेटण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या होत्या . घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला . दागिने व रोकड असा सुमारे ६२ हजार ४ ९ ३ रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले .