स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुचाकी रॅली संपन्न

जालना दि. 13 :- राज्य उत्पादन शुल्क विभाग, जालना व देशी/विदेशी मद्य विक्रता संघ, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दुचाकी वाहनांच्या रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र परळी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला.  यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.जिल्हाधिकारी कार्यालयातून दुचाकी रॅलीस सुरुवात होऊन मोतीबाग, शनीमंदीर, टाऊन हॉल, गांधी चमन, मंमादेवी चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, रामभाऊ राऊत चौक बस स्टॅण्ड, मामा चौक, टांगा स्टॅण्ड, छत्रपती शिवाजी पुतळा वीर सावरकर चौक, एम. जी. रोड, महावीर चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, मंमादेवी चौक, रेल्वे स्टेशन रोड, नुतनवसाहत, अंबड चौफुली मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुचाकी रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये प्रत्येक दुचाकीवर तिरंगा ध्वज लावण्यात आला होता. भारत माता की जय, घरोघरी तिरंगाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणुन गेला होता.