शिरुर दिनांक ( वार्ताहर )चैतन्य सद्‌गुरू योगीराज श्री शंकर महाराज समाधी दिनानिमित्त तिळवण तेली समाज मारुती मंदिर मुंबई बाजार शिरुर येथे धार्मिक कार्यक्रम , भक्ति संगीत व महाप्रसादाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते . सालाबादप्रमाणे चैतन्य सद्‌गुरु ब्रह्मांड नायक श्री. शंकर महाराज यांच्या  समाधी दिनानिमित्त स्वरसमर्थ अभंगवाणी भक्ति मंडळ पुणे यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला . गायक मुकेश बाद्रयानी यांनी अभंग गायन केले . त्यांना तबल्याची साथ सर्वेश बाद्रयानी यांनी दिली . पखवाज वादन सुजित लोहोर , हार्मोनियम वादन ज्योत्सना क्षीरसागर , यांनी केले टाळसाथ मंकरद ब्रादयानी केली तर स्वरसाथ ओंकार कुलकर्णी यांनी दिली . श्रीं चे पोथी वाचन प्रदीप गादिया यांनी केले . सूत्रसंचालन विलास गोसावी यांनी केले  श्रीं ची आरती झाल्यावर  महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .भाजपाचे नेते नोटरी धर्मेंद्र खांडरे ,माउली बहिरट , राजू शेख त्याच बरोबर समस्त सकल मराठा समाज संघ विश्वस्त  सागर नरवडे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली .

यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिल्याचे मीतेश गादिया व प्रीतेश गादिया यांनी सांगितले . सुनील चौधरी ,नीलेश नवले ,लोकेश चोपडा , संतोष पवार आदी यावेळी उपस्थित होते .रामआळी तील चरणपादुका मंदिर ( कुटे वाडा ) येथे ही सद्‌गुरू योगीराज श्री शंकर महाराज समाधी दिनानिमित्त महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 

फोटो ओळी -

श्री. शंकर महाराज यांचा समाधी दिनानिमित्त स्वरसमर्थ अभंगवाणी भक्ति मंडळ पुणे यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम झाला .