साहित्यीक बी.रघुनाथ यांंच्या स्मृतिदिनानिमित्त आज बुधवारी (दि.7) त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. मनपाच्या प्रशासक तथा आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी यावेळी अभिवादन केले. मनपाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मराठवाडा साहित्य परिषदेच्या परभणी शाखाध्यक्षा सरोज देशपांडे, बा.बा. कोटंंबे, उदय वाईकर, कुलकर्णी, काळे आदी उपस्थित होते. सर्वांनी बी.रघुनाथ यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मनपाचे जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव, भांडारपाल रामेश्वर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा, साहित्यीक व मसपाचे सदस्य उपस्थित होते.