बीड दि.13 (प्रतिनिधी) हनुमान नगर व मोंढा रोड परिसरातील अवैध लाकडी मशीन बंद करण्यात यावी यासाठी विनोद दादा हातागळे यांनी वन अधिकारी यांना निवेदन दिले आहे.

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

विनोद दादा हातागळे यांनी वनअधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, ते राहत असलेल्या घरासमोरील गल्लीतील रस्त्यावर आजूबाजूला अवैध लाकडी मशीन चा सुळसुळाट आहे. या मशीन मधील लाकडांची वाहतूक करणारे ट्रक टेम्पो ही अतिशय वेगाने गल्लीतील रस्त्यावरून वाहतूक करतात. तसेच या परिसरातील लहान मुले प्रौढ व्यक्ती महिला या रस्त्यावर असताना वेगाने धावणारे ट्रक मधून मोठमोठे लाकडी करून येथील लहान मुले, प्रौढ व महिला यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. 

तसेच या लाकडी मशीनच्या मालकांना व ट्रक चालकांना वारंवार सूचना देऊनही ते योग्य ती खबरदारी घेत नाहीत. आठ दिवसापूर्वी रस्त्याच्या बाजूने चालणारे एका शेळीचे अंगावर ट्रक घातला त्यावेळी लाकडी मशीनच्या मालकांना या संदर्भात सांगायला गेलो असता या उलट ते मशीन मध्ये पाळलेले कुत्रे अंगावर सोडतात व आम्हाला परिसरातील लोकांना आरेरावीची भाषा वापरतात त्यामुळे या परिसरामध्ये काही अनुसूचित प्रकार होण्याचे अगोदर वनविभाग अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी नसता जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर ही आंदोलन करण्याचा इशारा विनोद दादा हातागळे यांनी दिला आहे.