रानभाज्याचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी रानभाजी मोहोसत्वचे आयोजन फार महत्वाचे
:- तहसीलदार वर्षा मनाळे
माजलगाव - अशोक ढगे
ग्रामीण भागात आज ही लोकं रंभाज्याचा आपल्या आहारात समावेश करतात परंतु आज रानभाज्या रासायनिक शेती मुळ लुप्त होतायत म्हणून या भाज्यांचा प्रसार आणि प्रचार होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन येथील तहसीलदार वर्षा मनाळे यांनी स्वत्र्यांच्या अमृत महोत्सव व जागतिक आदिवासी दीना निमित्त कृषी विभाग व आत्मा कृषी विभाग पंचायत समितीच्या वतीने रान भाजी महोत्सव व महिला शेतकरी मेळाव्याच्या प्रसंती आपले विचार व्यक्त केले
स्वत्र्यांच्या अमृत महोत्सव व आदिवासी दिनानिमित्त कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) बीड कृषी विभाग पंचायत समिती उमेद अभियान आणि मा वी म माजलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव २०२२ व महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजित काल दि १२ रोजी येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केले होते यावेळी
उदघाटन मा. श्रीमती वर्षा मनाळे तहसीलदार यांनी केले कार्यक्रम चे अध्यक्ष मा. श्री एस. जी.हजारे गटविकास अधिकारी पंचायत समिती हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस. एस.संगेकर तालुका कृषी अधिकारी यांनी केले प्रमुख उपस्थिती मा. श्री एस. एस. मडके उपविभागीय कृषी अधिकारी, माजलगाव ,आर.आर. घनघाव सा. ग. वि. अ ,जे. बी भगत मंडळ कृषी अधिकारी गंगामसला, टी डी. वाघमोडे मंडळ कृषी अधिकारी केसापुरी, अण्णासाहेब जगताप पुरस्कार प्राप्त शेतकरी ,वैशाली नाईकनवरे व्यवस्थापक मावीम ,तात्या लोंढे तालुका व्यवस्थापक उमेद अभियान, डी.एल. गडपाळे कृषी वि.अ आणि कृषी विभागातील, कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्ताना ता कृषीअधिकारी एस एस संगेकर यांनी केले पुढे बोलताना वर्षा मनाळे म्हणाल्या की ,
अनेकांना रान भाज्यां व त्यांचे महत्व माहिती नाही या रानभाज्या महोत्सवामुळे या रान भाज्यांचे महत्व कळेल नैसगिर्क आणि सेंद्रिय पाले भाज्यांमुळे सकस आहार मिळतो तसेच या पासून कोणतेही अपाय होत नाहीत रानभाज्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आशा प्रकारच्या रानभाज्या महोत्सवाची अत्यंत गरज आहे . तर आपल्या अध्यक्षिय भाषणात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सिद्धेश्वर हजारे म्हणाले की ,
आजच्या रान भाज्या महोत्सवात बचत गट महिला महिला शेकरी , शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांचा सहभाग आनंद देणारा आहे . देशात भूक बळी होऊं नये म्हणून मोठी हरित क्रांती झाली यात उत्पन्न वाढले पण आज आलेले अन्न हे विष युक्त असल्याने आरोग्यास हानिकारक आहे या मुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जात आहे . या मुळे रान भाज्यांची ओळख राहिलेली नाही की त्याचे महत्व माहीत नाही एकत्रित कुटूंब पद्धती मध्ये जुने वयस्क मांनस या रान भाज्यांचं महत्व माहिती असल्यानं ते पुढील पिढीला सांगत असत पण आता विभक्त कुटूंब पद्धतीने घरत या गोष्टी सांगणारे कोणी नाही
राऊंड - अप सारख्या औषधांनी रान भाज्या लुप्त झाल्या आहेत २ एम एल च्या जागी १० एम एल डोस औषध शेतकरी पिकावर फवारणी करत आहे त्यामुळे शेती सुद्धा विषयुक्त झाली असल्याने सांगितले तर येथील पुरस्कार प्राप्त शेतकरी अण्णासाहेब जगताप यांनी आपले सखोल मार्गदर्शन यावेळी केले
या महोत्सवात विविध प्रकारच्या २५ रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या तर महिला शेतकऱ्यांना परस बागा साठी भाजीपाला किट चे वाटप करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आत्माचे गोपीनाथ पवार यांनी केले तर आभार कृषी सहाय्यक बापमारे यांनी केले