रत्नागिरी/ जिल्हा प्रतिनिधी

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

कारवांचीवाडी येथील ग्रामीण पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस उपनिरीक्षक रागिणी सावंत यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदावर पदोन्नती मिळाली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या हस्ते रागिणी सावंत यांना सन्मानित करण्यात आले.

रागिणी सावंत यांनी पोलीस दलात काम करताना प्रथम नियुक्ती लांजा तालुक्यात झाल्यानंतर सहा वर्षे उत्कृष्ट सेवा केली. त्यांची चिपळूण येथे बदली झाली तिथे ही त्यांनी आपल्या कामात प्रावीण्य मिळवले. त्यानंतर खेड पोलीस स्टेशन येथे बदली झाल्यानंतर साडेसहा वर्ष सेवा करून देवरूख आणि संगमेश्वर या पोलीस ठाण्यात सेवा बजावून वेगवेगळ्या गुन्ह्याची उकल त्यांनी केली आहे. एकूण बत्तीस वर्ष सेवा बजावून रागिणी सावंत यांनी आपल्या कामाचा आलेख चढताच ठेवला आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन महाराष्ट्र दिनी त्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर बढती झाली आहे. यावेळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या हस्ते रागिणी सावंत यांना सन्मानित करण्यात आले. तसेच पोलीस ठाण्याच्या वतीने पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत देखील करण्यात आले. 

रागिणी सावंत यांना सब- इन्स्पेक्टर ऑफ पोलीस या पदावर विराजमान झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक मिरा महामुने, सुनील चव्हाण, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सावंत आदी पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.