स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे निमित्याने गडचिरोली जिल्ह्यात
“रानभाजी महोत्सव” व “शेतकरी दिन” कार्यक्रामचे आयोजन संपन्न
गडचिरोली,दि.12: मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अन्यन्य साधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश असतो. रानातील म्हणजेच जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसर्गिकरित्या उगवल्या जाणा-या रानपालेभाज्या, फळभाज्या, कंद भाज्यामध्ये विविध प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोष्ठीक अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. तसेच सदर रानभाज्या नैसर्गिकरित्या येत असल्यामुळे त्यावर रासायनीक किटकनाशके / बुरशीनाशके फवारणी करण्यात येत नसल्यामुळे पुर्णपणे नैसर्गिक असल्याने या संपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्व व माहीती जास्तीत जास्त ग्रामिण तसेच
शहरी भागातील नागरीकांना होण्यासाठी व विक्रीव्यवस्था करून त्यांचे विक्रीतुन शेतक-यांनाही काही आर्थीक फायदा होणेसाठी लोकांमध्ये याबाबत जनजागृती स्थानिक नागरीकांना, तसेच शेतकरी बांधवाना रानभाजी ओळख, त्यांचे उपयोग आणी महत्व कळावे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा आत्मा, गडचिरोली कार्यालयाच्या वतीने नारळी पोर्णिमेच्या दिवशी दिनांक 11 ऑगस्ट 2022 गुरुवार रोजी जिल्हास्तरीय “रानभाजी महोत्सव" व पद्मश्री डॉ. विठठलराव
विखे पाटील यांच्या जयंती निमित्त “शेतकरी दिन" कार्यक्रमाचे आयोजन कृषि विज्ञान केंद्र, सोनापुर, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले. रानभाजी महोत्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटिल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक श्री. आबासाहेब धापते, प्रकल्प उपसंचालक, आत्मा, गडचिरोली यांनी केले. अपर जिल्हाधिकारी, गडचिरोली धनाजी पाटील
यांनी सहकार तत्वावर रानभाज्यांचे मुल्यवर्धन व विक्री व्यवस्थापन करण्याचे शेतक-यांना आवाहन केले. डॉ.निलीमा पाटिल, विषय विशेषज्ञ, (गृह विज्ञान) यांनी रानभाज्यांचे मुल्यवर्धन विषयी मार्गदर्शन केले. डॉ.सुचित लाकडे, विषय विशेषज्ञ (फलोद्यान) यांनी रानभाज्यांचे जतन व अभिवृद्दी विषयी माहिती शेतक-यांना दिली. संदिप क-हाळे, प्रकल्प संचालक, आत्मा तथा कार्यक्रम समन्वयक, कृ.वि.कें.गडचिरोली यांनी रानभाज्यांचे आहारातील महत्व व त्यांच्या विक्रीतून आर्थिक उन्नती साधता येईल याविषयी शेतक-यांना मार्गदर्शन केले. यानंतर प्रदिप वाहणे, प्र. उपविभागीय कृषि अधिकारी,
गडचिरोली यांनी उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या वेळेस माविमचे महिला बचत गट, आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गट, कृषि महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्रगतशिल शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात महिला बचत गट व शेतकरी गटांनी रानभाज्यांचे नमुने व पदार्थ तयार करुन आणले होते. सर्वात शेवटी श्री. उंदिरवाडे यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेतक-यांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर ताथोड, हेमंत आंबेडारे, डॉ. अभिजीत कापगते, बाळू गायकवाड व राहुल मेश्राम यांनी परिश्रम घेतले.