शिरुर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष सुशांत किशोर कुटे यांनी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजिनामा दिला असून राजिनाम्याचे पत्र मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना पाठवीले आहे . कुटे यांनी पक्षाचे शहराध्यक्ष , विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष व उपाध्यक्ष व जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष अश्या विविध पदांवर काम केलेले आहे . शहरात मराठी पाट्या लावण्याचे आंदोलन सह विविध नागरी प्रश्नांवर कुटे यांनी आंदोलने केली होती वीजेचा प्रश्नावरील आंदोलनात त्यांना कारावास ही भोगावा लागला होता . पक्षश्रेष्ठींचे होत असलेल्या दुर्लक्षा मुळे पक्षाला सोडत असल्याचे कुटे यांनी सांगितले . मनसेचे नेते वसंत मोरे यांच्या पाठोपाठ पुणे जिल्ह्याच्या  ग्रामीण भागातील कुटे यांनी ही मनसेला जय महाराष्ट्र केला आहे कुटे यांची पुढील वाट कोणती असणार याबाबत उत्सुकता आहे