अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२२ मध्ये पल्लवी बांगर यांची निवड...
ग्रामस्थांच्या वतीने सत्कार...
बिडकिन प्रतिनिधी:-
अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा सन २०२२ यांच्या माध्यमातून व जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुका स्तरावर विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.बिडकिन येथील एच पी एल विद्यालय बिडकिन येथे दि.३०/०८/२०२२ रोजी आयोजन करण्यात आले होते.या तालुकास्तरीय मेळाव्यात एकुण ४६ शाळांनी सहभाग घेतला होता.गुणाक्रमे एच पी एल विद्यालय बिडकिन येथील कु.पल्लवी कृष्णा बांगर,रा.गिरजापुर हिची निवड करण्यात आली आहे.याप्रसंगी गिरजापुर सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बांगर, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन भाऊ गि-हे, ग्रामपंचायत सदस्य शंकर बांगर व गिरजा गणेश मंडळ आणि गावकरी यांच्या वतीने सत्कार करत पुढिल कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या..