शिरुर  :छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा खुणा, आठवणी व पराक्रम जपणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगून छत्रपती संभाजी महाराज हे कुशल संघटक व प्रशासक होते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुळापुर, ता. हवेली येथे म्हणाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान भूमी व समाधीस्थळ असणा-या तुळापुर व वढू येथे ३६९ कोटी रुपयांचे स्मारक व विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, म्हाडाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान स्थळी व समाधी स्थळी उचित स्मारक झाले पाहिजे याकरिता अगोदर स्मारकाकरीता २६९ कोटी रु.आराखडा तयार करण्यात आला होता तो आता ३९७ कोटी रुपयेचा करण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची बलिदान भूमी व समाधीस्थळ ही आपणां सर्वांसाठी तीर्थक्षेत्र आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून शासन राज्य कारभार करत आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी कठोर संघर्ष केला. स्वराज्याची धुरा सांभाळण्याचे स्वराज्य पुढे नेण्याचे काम छत्रपती संभाजी महाराज यांनी केले .मोगलांशी लढा दिला, औरंगजेबाला जेरीस आणले. स्वराज्याची पायाभरणी शिवाजी महाराज यांनी केली तर त्यावर कळस चढविण्याचे काम छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा खुणा, आठवणी , पराक्रम जपणे हे आपले कर्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भारतीय नौदल दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात साजरा केला. राज्य शासनाने मागील दीड वर्षात सर्वसामान्यांच्या हिताचे कल्याणाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस म्हणाले की अनन्वित अत्याचार सहन करून ही छत्रपती संभाजी महाराज यांनी आपला विचार सोडला नाही. छत्रपती संभाजी महाराज यांचे अनेक भाषांवर प्रभूत्व होते. त्याच्या कडे अलौकिक असे धैर्य व शौर्य होते. राजकारणात ते निपुण होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभी केलेली राज्य व्यवस्था अधिक प्रबळ छत्रपती संभाजी महाराज यांनी केल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सरकारने केल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यानी क्रांतीची ज्योत पेटवली स्वराज्याचा मंत्र दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही म्हटले की आमची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराज आहे. असे सांगून फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेवून आम्ही काम करत आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श घेवून राज्यातील सरकार ही रयतेची सेवा करीत राहील . उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना स्मारका संदर्भातील माहिती दिली. त्याच बरोबर संभाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा आढावा ही घेतला. स्मारकाचे काम दर्जेदार करावे अशी सूचना करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला साजेशे स्मारक राज्य शासनाचा माध्यमातून करत असल्याचे सांगितले.

Sponsored

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट - बूंदी

देव क्लासेज व मून रेस्टॉरेंट की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

फोटो ओळी- छ्त्रपती संभाजी महाराज स्मारक भूमीपूजन प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार