शिरूर – एस.के. खांडरे भैय्या सराफ ज्वेलर्स या दुकानाचे उद्घाटन सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० वा.शिरूर नगरपरिषदेचे माजी सभागृह नेते प्रकाश रसिकलाल धारिवाल व दिनाभाभी प्रकाश धारीवाल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शंतनूभैय्या सुरेश खांडरे यांनी दिली. शहरातील सर्वात मोठे सुवर्णदालन व सर्वात कमी मजुरी ही या सुवर्णदालनाची वैशिष्ट्ये असल्याचे खांडरे यांनी सांगितले. शंतनू खांडरे म्हणाले की खांडरे या प्रख्यात सुवर्ण पेढीची २०० वर्षाहून अधिक वर्षाची विश्वासार्ह परंपरा आहे. पहिली पिढी चिन्न्पा कंडूजी खांडरे सराफ दुसरी पिढी काशिनाथ चिन्नपा खांडरे सराफ , तिसरी पिढी सदाशिव काशिनाथ खांडरे सराफ व चौथी पिढी सतिश सदाशिव खांडरे व सुरेश सदाशिव खांडरे व पाचवी पिढी शंतनू सुरेश खांडरे अश्या पाच पिढ्या या सुवर्ण पेढीत घडल्या . सुभाष चौकात दुमजली इमारतीत हे नविन सुवर्णदालन सुरु करण्यात आले असून या ठिकाणी मनमोहक व कलाकुसरीचे दागिने आधुनिक हॉलमार्क प्रमाणित दागिने उपलब्ध असल्याचे खांडरे यांनी सांगितले. उद्घात्नाचा कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन खांडरे यांनी केले आहे.