बीड /अंबाजोगाई दि. 14/ दिवसभराचे काम आटोपून पतसंस्थेत जमा केलेली रक्कम ठेवण्यासाठी निघालेल्या रोखपालाला तिघा चोरट्यांनी अडवून पिस्तुल व चाकूचा धाक दाखविल्याची घटना शुक्रवारी (दि. 16) रात्री अंबाजोगाई येथे घडली.

 अधिक माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील राजर्षी शाहू पतसंस्थेचे रोखपाल गणेश देशमुख हे ५० हजारांची रक्कम ठेवण्यासाठी नोकरासह दुचाकीवरून निघाले होते. ते मुकुंदराज कॉलनीत आले असता पहाऱ्यावर असलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना अडवले. स्वत:कडील पिस्तूल काढून त्यांनी देशमुख यांच्या डोक्याकडे दाखवले. पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत देशमुख यांच्याकडील ३९ लाख रुपये असलेली बॅग घेऊन पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, भर वस्ती येथे घडलेल्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.