सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन पुकारून निषेध

सेनगांव पंचायत समिती कार्यालयासमोर जयपूर येथील काही नागरिकांनी आपल्या विविध मागण्यासाठी आज दिनांक 14 फेब्रुवारी वार बुधवार 12 वाजण्याच्या सुमारास ढोल बजाओ आंदोलन पुकारून निषेध नोंदविला आहे.जयपुर ग्रामपंचायत कार्यालयाची सखोल चौकशी व कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने सेनगांव पंचायत समिती कार्यालयासमोर अर्जदार राजेंद्र मोरे व द्वारकादास झंवर यांनी ढोल बजाव आंदोलन पुकारले आहे. अनेक वेळा निवेदनकर्त्यांनी जयपुर ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली मात्र अद्याप पर्यंत कोणत्याही प्रकारची ठोस अशी कार्यवाही न करण्यात आल्याने ढोल बजाओ आंदोलन पुकारण्यात आले.