शिरुर - शिरूर नगर परिषद, घोडनदी ने माझी वसुंधरा ४.० व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित केलेल्या विविध स्पर्धेत शिरूर शहरातील एकूण ८ शाळा व ७ महाविद्यालय अश्या १५ शाळा व कॉलेज सहभागी झाले . निबंध ,वक्तृत्व ,चित्रकला, रांगोळी, पथनाट्य व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनविणे अश्या ६ स्पर्धेत एकूण ५००० पेक्षा अधिक मुले व मुलींनी सहभाग घेतला . स्वच्छ शिरूर-सुंदर शिरूर, माझी वसुंधरा अभियान, प्लास्टिक बंदी काळाची गरज, पाणी हेच जीवन अश्या विषयांकरिता लहान-मध्यम-मोठ्या गटांसाठी स्पर्धा घेण्यात आल्या . एकूण ६९० मुलांना बक्षीस म्हणून ट्रॅाफी व प्रमाणपत्र वाटप शिरूर नगर परिषदेमार्फत करण्यात आले. यावेळी काअही शिक्षकांचा पर्यावरण दूत म्हणून सन्मान शिरूर नगर परिषदेने केला. माझी वसुंधरा ४.० व स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमांकरिता सीएसआर अंतर्गत देणगी म्हणून , बँक ऑफ इंडिया, शाखा शिरूर ने एकूण ३०० ट्रॅाफी तसेच, तुषार सोमनाथ घावटे, प्रतिभा संभाजी महाडिक, स्वप्नील अप्पासो पोटघन यांनी एकूण ३९० ट्रॅाफी नगर परिषदेस दिल्या या सर्व ट्राफी बक्षिस विजेत्या विद्यार्थ्याना देण्यात आल्या . स्पर्धेचे आयोजन मुख्याधिकारी स्मिता काळे , शहर रचना सहाय्यक पंकज काकड व लेखाधिकारी पंकज माने यांनी केले होते . शहर समन्वयक शुभम निचित व १५ सहाय्यक कर्मचाऱ्यानी स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेले.