शेतकर्याचा मुलगा बनला मंञालयात सहकार अधिकारी अन धुळे जि. प. ला लेखाधिकारी.
वाडे येथील विनय राजपुत या विदयार्थ्याचे असेही यश अन अशीही निवड.
भडगाव वार्ताहर —
शेतकरी शेतात घाम गाळुन सोने पिकवितो. त्याच्या कष्टाला फळ येते. माञ विदयार्थ्यांनी मोठे अधिकारी बनण्याची जिद्द व चिकाटी मनात ठेवली तर नोकरी लागुनही मोठया अधिकारी पदांवर कशा संध्या आपोआप चालत येतात. याची प्रचीती , सुखद प्रसंग भडगाव तालुक्यातील वाडे येथील शेतकरी कुटुंबात पहायला मिळत आहे. वाडे येथील विनय उदयसिंग राजपुत यांची नुकतीच 'सहकार मंत्रालय,महाराष्ट्र शासन' येथे 'सहकार अधिकारी गट ब' या पदी निवड झालेली आहे.
यासोबतच त्यांची 'जिल्हा परिषद, धुळे' येथे 'लेखाधिकारी' या पदावरदेखील निवड झाली आहे.
ते 'सैनिक स्कूल,चंद्रपूर' येथे 'नॉन-टिचिंग स्टाफ' या पदावर २०२१ पासुन कार्यरत आहेत. विनयचे शिक्षण बीएससी मॅथेमॅटीक्स झाले आहे. त्यादरम्यान रेल्वे विभागाची परीक्षा २०१९ मध्ये दिली होती त्यांची भारतीय रेल्वेत 'टेक्निशियन' या पदी नागपुर येथे निवड झाली होती. माञ त्यावेळी विनयने नोकरी स्विकारली नव्हती.
ते वाडे येथील प्रगतीशील शेतकरी व श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक उदयसिंग बाबुसिंग परदेशी यांचे कनिष्ठ सुपुत्र आहेत.
विनय परदेशी याचे संपुर्ण शिक्षक जामनेर येथे मामांकडे झालेले आहे. जामनेर येथील त्यांचे मामा योगेश हुलसिंग राजपुत यांचे त्यांना वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. विनय राजपुत हा सुरुवातीपासुनच अभ्यासात हुशार होता.मागील वर्षी विनय राजपुत हा चंद्रपुर येथील सैनिक स्कुलमध्ये नाॅन टीचींग या पदावर २०२१ पासुन नोकरीस लागला होता. त्याची सुरुवातीपासुन मोठया अधिकारी पदावर जाण्याची ईच्छा होती. माञ मागील वर्षी विनयला परीक्षेत यश आल्याने चंद्रपुर येथील सैनिक स्कुलमध्ये नोकरी स्विकारली. घरची परीस्थिती जेमतेम असल्याने आपल्या परीवाराला आपला नोकरीमुळे हातभार लागेल हा उद्देश त्याने डोळयासमोर ठेवला. तो खचला नाही. एकीकडे नोकरीला लागल्याचा घरच्यांना आनंद होता. माञ विनय राजपुतने
चंद्रपुर येथे नाॅनटीचींगची नोकरी असतांना बाहेरुन परीक्षा देणे सुरुच ठेवल्या. त्याच्या मनात जिद्द होती. ती जिद्द त्याने सोडली नाही. अभ्यास सुरुच ठेवला. त्याने सहकार, पणन व वस्ञोदयोग मंञालयाची परीक्षा २०२३ मध्ये दिली होती. जि. प. विभागाची परीक्षा २०२३ मध्ये दिली होती.
तरीही जिद्द , चिकाटी सुरुच होती. मोठया अधिकारी पदावर जाण्याचे त्याचे स्वप्नच मनी होते. परीक्षा, अभ्यास सुरुच होता. आणि विनय राजपुतला पुन्हा यशाने त्याच्या उंच यशाच्या शिखरावर नेले आहे. नुकत्याच दोन परीक्षेचा निकाल लागला. यात सहकार मंञालय महाराष्टृ शासन येथे सहकार अधिकारी गट ब या पदीतर निवड झालीच. परंतु त्याचसोबत दुसरीही निवड धुळे येथे जिल्हा परीषदमध्ये लेखाधिकारी या पदावरही झालेली आहे. त्यामुळे विनय राजपुतचे भविष्य उज्वल बनले आहे. या परदेशी परीवाराचा नावलौकीक झाला आहे. वाडे येथील या शेतकरी परीवारात आनंदी आनंद गडे असे वातावरण पहायला मिळत आहे. याबाबत विनय राजपुत यांच्या समोर उच्च अधिकारी पदावर जाण्याचे नव्याने दोन निवडीचे पर्याय खुले आहेत. माञ याबाबत विनय राजपुत याचेशी संपर्क साधला असता त्याने सांगीतले कि, मला जर दोन ते तीन परीक्षांमध्ये मोठे यश आले. माञ मी सहकार मंञालय महाराष्टृ शासन येथे सहकार अधिकारी गट ब या पदावर नोकरी स्विकारण्याचे माझे नियोजन व मत आहे. असे विनय राजपुत याने दै. लोकमतशी बोलतांना सांगीतले. विनय राजपुत याचेवर शुभेच्छांचा वर्षाव होतांना दिसत आहे. कजगाव वाडे जि. प. गटाचे माजी सदस्य डाॅ. कर्तारसिंग सरदारसिंग परदेशी , व पञकार अशोकबापु परदेशी, तसेच वाडे येथील श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन देविदास माळी, संचालक डाॅ. दिवाकर पाटील, संचालक अशोक भुतेसिंग परदेशी, संचालक उदयसिंग परदेशी, सचीव अर्जुन पाटील, दिलीप पाटील, हनुमान सोनार, ज्ञानेश्वर महाजन, दुलीचंद परदेशी आदि विकासो कर्मचारी व सरदार बारवाळ, दुध सोसायटीचे माजी संचालक संजय बडजावत, सचिव शांताराम पाटील, केळी व्यापारी भाऊसाहेब पाटील, भिकन पाटील, शिक्षक शशिकांत महाजन, प्रविण महाजन, ग्रामस्थ आदिंनी विनय राजपुतचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. वाडे येथील या विदयार्थ्याची ही यशोगाथा तरुणांना मोठी प्रेरणादायी ठरतांना दिसत आहे. वाडे हे बागायती गाव मानले जाते. बहुतांश शेतकरी शेतात कष्ट करुन शेती मातीची सेवा करतात. याच मातीतुन अनेक विदयार्थी नोकरी, उदयोग, व्यवसायात सर्वच क्षेञात प्रगती करतांना दिसत आहेत. आजही अनेक विदयार्थी विविध परीक्षांमध्ये यश मिळवुन विविध अधिकारी वा ईतर पदांवर कार्यरत आहेत. ही यशोगाथाची परंपरा गावात सुरुच असल्याचा आनंद गावकर्यांना आहे.
प्रतिक्रीया —
माझे शिक्षण बी एस सी मॅथेमॅटीक्स झाले आहे.
मी २०२१ वर्षी चंद्रपुर येथील सैनिक स्कुलमध्ये नाॅनटीचींगमध्ये नोकरीला लागलो. मी आज तेथे कार्यरत आहे. माझी सुरुवातीपासुन मोठा अधिकारी बनावे अशी जिद्द होती. माञ घरची परीस्थिती साधारण असल्याने मी ती नोकरी स्विकारली. माञ परीक्षा मी देतच राहीलो. अभ्यास सुरुच ठेवला.हिम्मत खचलो नाही. मी सहकार, पणन व वस्ञोदयोग विभागाची परीक्षा २०२३ मध्ये दिली होती. तसेच जि. प. विभागाची परीक्षा २०२३ मध्ये दिली होती. नुकत्याच दोन्ही परीक्षांचा निकाल लागला आणि माझी दोन मोठया अधिकारी पदावर निवड झाली आहे. यात सहकार मंञालय महाराष्टृ शासन येथे सहकार अधिकारी गट या पदि तर दुसर्याठिकाणी धुळे जि. प. मध्ये लेखाधिकारी या पदावरही निवड झाली. यात मला आता सहकार मंञालय महाराष्टृ शासन येथे सहकार अधिकारी गट ब या पदासाठी नोकरी करण्याची ईच्छा आहे. तसे माझे निर्णय घेण्याचे चालु आहे. माझ्या आई, वडील, मामांनी मोठया मेहनतीने, कष्टाने मला शिकविले अन घडविले. याचा मला सार्थ अभिमान आहे. मामांचे मला अनमोल सहकार्य लाभले.
विनय उदयसिंग राजपुत. वाडे. ता. भडगाव. जि. जळगाव.
फोटो — विनय राजपुत.
फोटो — वाडे येथील विनय राजपुतचा सत्कार करतांना पञकार श्री. अशोकबापु परदेशी व उपस्थित परीवार.