शिरुर : आमदाबाद मध्ये युवकांनी गिरविले श्रमसंस्काराचे धडे शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त आमदाबाद येथे आयोजित केलेले राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिरामध्ये युवकांनी आमदाबाद येथील सुमारे अकरा एकर क्षेत्रामध्ये चिंचेचे बन विकसित केलेले आहे. या क्षेत्रामध्ये साधारण पाचशे चिंचेची झाडे यापूर्वीच लागवड केलेली असून ग्रामस्थांसह या झाडांचे जतन आणि संवर्धन करण्याच्या व्यापक भूमिकेतून यंदाही युवकांनी भरीव असे योगदान दिले. शिबिरात ग्राम सर्वेक्षण, ग्रामस्थ भेट, प्रबोधन, गटचर्चा, सहभोजन आणि विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले . शिबिराचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ व विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले. संस्कार हीच आयुष्याची सर्वात मोठी शिदोरी असून राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार जोपासणे काळाची गरज असल्याचे सांगून शिक्षण व्यवस्थेमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. या बदलांकडे आव्हान म्हणून न पाहता संस्थाचालक, शिक्षक व विद्यार्थी या घटकांनी संधी म्हणून पाहणे गरजेचे असल्याचे ढमढेरे म्हणाले . यावेळी आमदाबादच्या सरपंच सोनाली थोरात, तालुका भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, श्री. वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानचे संचालक ज्ञानेश्वर फराटे , तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष रामदास थोरात, सुनील शेलार, उद्योजक सतीश थोरात, माजी सरपंच पोपटराव घुले, उपसरपंच प्रदीप साळवे, नितीन थोरात, माजी सरपंच बबनराव थोरात, अविनाश सोनार, मेजर भाऊसाहेब जाधव, ह. भ. प. नवनाथ माशेरे महाराज, , अशोक माशेरे, उत्तमराव फराटे, साईनाथ घुले, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल थोरात, आबासाहेब पवार, मुख्याध्यापिका सुनीता जगताप, सखाराम थोरात, प्रकाश सत्तूभाऊ थोरात, मंदा चौरे, मनोज गांधी, प्राचार्य अशोक नवले, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ पाटील, प्रा . डॉ. संदीप सांगळे आदी उपस्थित होते. यावेळी आबासाहेब सोनवणे यांनी स्वयंसेवकांना श्रमप्रतिष्ठा जोपासण्याचे आवाहन केले. . राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी प्रास्ताविक तर कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सोमनाथ पाटील यांनी आभारप्रदर्शन केले डॉ. दत्तात्रय कारंडे यांनी सूत्रसंचालन केले. सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप महेशबापू ढमढेरे यांच्या उपस्थितीत झाला . तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाने आमदाबाद हे गाव दत्तक स्वरूपात स्वीकारले असून या गावच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण प्रसारक मंडळ व साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महेशबापू ढमढेरे यांनी केले. या पुढील काळात महाविद्यालय सातत्याने आमदाबादमध्ये विविध उपक्रम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिबिरामध्ये अमृतवाणी उपक्रमांतर्गत ह.भ. प. नवनाथ महाराज माशेरे यांनी "छत्रपती शिवराय" या विषयावर तर श्री. भानुदास सात्रस यांनी "महात्मा गांधी आणि श्रमप्रतिष्ठा" या विषयावर युवक व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व ग्रामस्थ यांनी संयुक्तपणे प्रभात फेरी काढून आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा सोहळा संपन्न केला. आमदाबादचे ग्रामदैवत व इतर मंदिरांमध्ये प्रभात फेरीच्या माध्यमातून आरती करण्यात आली. तसेच सायंकाळी ह. भ. प. संभाजी महाराज दरोडे यांचे श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्ताने विद्यार्थी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांसाठी सुश्राव्य अशा कीर्तनाचे आयोजन केले गेले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांतभाऊ सातपुते, ज्येष्ठ संचालक विजूकाका ढमढेरे, यांच्यासह शि. प्र. मंडळाचे सर्व संचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.