शिरुर : येथील बाबूरावनगर येथील ज्ञानसागर अभ्यासिकेच्या चार विद्यार्थ्यांनी  राज्य लोकसेवा आयोगाच्या  परीक्षेत यश मिळविले आहे .

यासंदर्भात अभ्यासिकेचे संचालक प्रा .सुधीर शिंदे यांनी सांगितले की अभ्यासिकेचे मावळेवाडी येथील मंत्रालयात लेबर ऑफिसर असणारे सागर कदम यांची  जाहीर झालेल्या निकालात राज्यसेवा मेरिट लिस्ट मध्ये ७५ व्या क्रमांक आला आहे . तर जांबूत येथील गोरक्ष गाजरे यांचा मेरिट लिस्ट मध्ये २८५ वा क्रमांक आला आहे मंत्रालयात सध्या एएसओ आधिकारी म्हणून कार्यरत आहेत . तर मंत्रालयात कक्ष आधिकारी असणारे धनेश बनकर हे मेरिट लिस्ट मध्ये ३८० वे आले आहेत त्याच बरोबर पीएसआय असणारे पवन मोरे यांची एसटीआय  ऑफिसर म्हणून निवड झाली आहे . हे सर्व ज्ञानसागर अभ्यासिकेचे विद्यार्थी असून अभ्यासिकेतुन वर्ग -१ व वर्ग वर्ग -२ चे आधिकारी झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले .