दावोस , दि. १६ : - जागतिक आर्थिक परिषद- वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमची २०२४ ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे सुरु झाली आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे येथे होत आहे. या पार्श्वभुमीवर स्वित्झर्लंडमधील भारतीयांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले आहे. स्वित्झर्लंडमध्ये विविध भागात राहणाऱ्या या भारतींयांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे मोठ्या अपुर्वाईने स्वागत करण्याचे निश्चित केले आहे. भारतीयांच्या विशेषतः या मराठी भाषिकांनी झुरीक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास येण्याचे मान्य केल्याबद्दल या सर्व मराठी बांधवांनी विशेष आनंदही व्यक्त केला आहे. या निमित्ताने स्वित्झर्लंडमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायीक झालेल्या या मराठीजनांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्याबाबत स्वागताच्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. या परिषदेच्या यशासाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. बृहन्महाराष्ट्र स्वित्झर्लंडचे (जीनिव्हा) अध्यक्ष अमोल सावरकर म्हणाले की, मुख्यमंत्री श्री. शिंदे हे एका महत्वाच्या गुंतवणूक परिषदेसाठी इथे येत आहेत. इतक्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी मराठी जनसमुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे, हे विशेष. म्हणूनच आम्हाला आनंद झाला आहे. त्यांच्या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा देत आहोत. महेश बिराजदार (मूळचे लातूर), मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे नेतृत्व आम्हा मराठी जनांसाठी खूप प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत करताना, त्यांना शुभेच्छा देताना खूप खूप आनंद होत आहे. श्रीमती किर्तीमालिनी गद्रे (पदाधिकारी महाराष्ट्र मंडळ, स्वित्झर्लंड), मी मुळची ठाण्याची आहे. त्यामुळे आमच्या ठाण्यातील श्री. शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून येथे येत आहे. याचा सर्वात मोठा आनंद आहे. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही महाराष्ट्र मंडळातर्फे मोठी तयारी केली आहे. त्यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली आहे, याचाही खूप मोठा आनंद आहे. शेखर काकडे यांनी पत्नी विद्या, कन्या बिल्वा काकडे (झुरीक) यांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की आम्ही झुरीकमध्ये गेली दहा वर्षे राहत आहोत. मुख्यमंत्री श्री. शिंदे स्वित्झर्लंड दौऱ्यासाठी येत आहेत. याचा खूप मोठा आनंद आहे. स्वित्झर्लंडमधील तमाम महाराष्ट्रीयन बांधवांच्यावतीने स्वागत करतो, आणि त्यांच्या या दौऱ्यालाही शुभेच्छा देतो. प्रभूद्य यत्नाळकर हे मुळचे पुण्याचे आहेत. ते झुरीकमध्ये राहतात. त्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी स्वागत केले आहे. सौ. मंजिरी यत्नाळकर यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे झुरीकमध्ये स्वागत करताना खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यालाही शुभेच्छा दिल्या आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
100 रुपये से कम में BSNL के 5 रिचार्ज प्लान, डेटा के साथ मिल रहे कॉलिंग बेनिफिट
BSNL Cheapest recharge plans बीएसएनएल 100 रुपये से कम में कई बेस्ट प्लान ऑफर करता है। इनमें कई...
PM મોદીને આવકારવા જામકંડોરણામાં તડામાર તૈયારીઓ | PM Modi in Saurashtra | ZEE 24 Kalak
PM મોદીને આવકારવા જામકંડોરણામાં તડામાર તૈયારીઓ | PM Modi in Saurashtra | ZEE 24 Kalak