शिरुर : पिस्तुल मधुन फायरींग करून दहशत निर्माण करणा-या रेकॉर्ड वरील आरोपीना पोलीसांनी अटक केली आहे . याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात आदित्य नितीन भोईनल्लू रा. हनुमान मंदीरा शेजारी, कामाठीपुरा, शिरूर ता. शिरूर जि. पुणे यांनी तक्रार दिली आहे . दिनांक १३ जानेवारी २४ रोजी रात्री शिरूर गावचे हददीतील आर. के. हॉटेल समोर पुणे-अहमदनगर हायवे रोडवर आदित्य यांचे बंधू वैभव भोईनल्लु याचे सोबत असलेल्या जुन्या वादाच्या रागातुन अरबाज शेख याने आदित्य यांना जीवे मारण्याचे उददेशाने पिस्तुल मधुन गोळी फायर केली पंरतु ती त्यांना लागली नाही. त्यांनतर शिरूर शहरातील कामाठीपुरा येथे हनुमान मंदीरा जवळील कट्टयावर आदित्य त्यांच्या मित्र समवेत बसलेले असता तेथे मोटारसायकलीवर १) आशितोष काळे, २) अरबाज शेख, ३) पप्पु राजापुरे, ४) अरबाज खान, ५) प्रविण तुबाकी, ६) प्रकाश गायकवाड, ७) शुभम गाढवे, ८) कुणाल म्हस्के सर्व रा. शिरूर आले व शिवीगाळ दमदाटी केली .आशितोष काळे याने त्याचे कडील पिस्तुल मधुन आदित्य तेथुन पळून जात असताना त्याच्या दिशेने एक गोळी झाडली पंरतु ती त्याला लागली नाही. या तकारी वरून पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम ३०७,१४३,१४८, १४९,५०४, ५०६ भारतीय हत्यार कायदा कलम ३.२५, २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव हे करीत आहेत. यातील आरोपी १) आशितोष मिलींद काळे वय २४ वर्षे रा. साईनगर, शिरूर ता. शिरूर जि. पुणे २) अरबाज रहीम शेख वय २३ वर्षे रा. सय्यदबाबानगर , शिरूर ता. शिरूर जि. पुणे ३) प्रकाश विलास गायकवाड वय २० वर्षे रा. जाधवमळा, रामलींग रोड, ता. शिरूर जि. पुणे यांना वेगवेगळे पथक तयार करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मदतीने अटक करण्यात आली आहे . आरोपी आशितोष मिलींद काळे याचे विरुध्द यापुर्वी ०७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी अरबाज रहीम शेख याचे विरुध्द यापूर्वी ०६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीना न्यायालयाने १७/०१/२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे . आरोपी अरबाज रहीम शेख याचे कडून गुन्हा करताना वापरलेले एक पिस्तुल व एक जिवंत राऊन्ड असा एकुण २०, २००/-रु. चा माल तपासात हस्तगत करण्यात आलेला आहे. हा तपास पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घटटे , उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारे यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, पोलीस उपनिरीक्षक सुनिल उगले, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे , तुषार पंदारे सहाय्यक फौजदार, जनार्दन शेळके , बबलु नागरगोजे राजु मोमीन, सहाय्यक फौजदार गणेश देशमाने, प्रताप टेंगले, विनोद काळे, सचिन भोई, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, गणेश पालवे, अक्षय कळमकर या पथकाने केला