शिरुर ,दिनांक ( वार्ताहर ) : केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना मिळण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे शिरुर येथे बसस्थानकाचा मागील रयत शाळेचा मैदानात नागरिकांनी स्वागत केले . याप्रसंगी विविध योजनाचे लाभार्थी सहभागी झाले होते. शिरुर नगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना (नागरी), दिव्यांग बांधव कल्याण निधी योजना, आयुष्यमान भारत कार्ड योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, उज्जवला गॅस योजना स्वच्छ भारत अभियान योजनांची माहिती नगरपालिकेचे आधिकारी व कर्मचारी यांनी दिली. याप्रसंगी अनेक लाभार्थ्यानी योजनांकरिता नावनोंदणी केली, अशी माहिती मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी दिली. यावेळी पोलीस निरीक्षक संजय जगताप, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, वैद्यकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी , प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचे जिल्हा अमंलबजावणी सदस्य ॲड .धर्मेंद्र खांडरे , भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रदीप उर्फ आबासाहेब सोनवणे ,शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात, माजी नगरसेवक विनोद भालेराव , भाजपाचे माजी शहराध्यक्ष केशव लोखंडे, विजय नरके ,मितेश गादिया , हुसेन शहा , अनघा पाठकजी , यासह विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष सहयोग देऊन नागरिकांकरिता वेगवेगळ्या योजनांचे कॅम्प आयोजित केलेले होते. यामध्ये आयुष्यमान भारत योजना, आधार कार्ड योजना, उज्वला गॅस योजना, विश्वकर्मा योजना आरोग्य तपासणी शिबिर प्रधानमंत्री स्वानिधी योजना इत्यादी जन उपयोगी योजनांचे लाभ नागरिकांना देण्यात आले. सदर शिबिराकरिता एकूण ११६३ नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती त्यापैकी सुमारे ६०० नागरिकांनी विविध योजनांचे लाभ घेतले. सदर कार्यक्रमा अंतर्गत संकल्प भारत योजनेच्या वाहनाच्या 22 इंची स्क्रीनवर नागरिकांना शासनाच्या विविध उपक्रमाबाबत माहिती देण्यात आली.सदर कार्यक्रमांमध्ये आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड योजना विश्वकर्मा योजना, उज्वला गॅस योजना, आरोग्य शिबिर इत्यादी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या करिता विजय आंधळे नगर परिषदेचे संगणक अभियंता रत्नदीप पालखे, रचना सहायक पंकज काकड, नगर अभियंता पल्लवी खिलारे, कर निरीक्षक रामचंद्र नरवडे, अक्षय बनगिनवार, लेखापरीक्षक मोहन गुरव, लेखाधिकारी पंकज माने, पाणीपुरवठा अभियंता राजश्री  मोरे, स्वच्छता निरीक्षक . डी. टी.बर्गे, आस्थापना विभाग प्रमुख विठ्ठल साळुंखे, चंद्रकांत पठारे, , प्रमोद पवार, , उपेंद्र पोटे, अनिल चव्हाण, महेश गावडे, शुभम निचित, स्वप्निल तरटे, स्वप्निल शिंदे, विजय गायकवाड, प्राची वाखारे, प्रांजल भोयर, महेश लोळगे, सागर कांबळे यांसह ग्रामीण रुग्णालय शिरूर वैद्यकीय पथक, पोलिस दल, शहरातील नागरी सुविधा देणाऱ्या विविध एजन्सीज चे कर्मचारी यांनी व यांचे अधिनस्त असणारे पथक यांनी वेगवेगळ्या योजनांचे माध्यमातून लाभार्थी यांना लाभ दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण कडेकर यांनी केले. सदर कार्यक्रमात पत्रकार दिनाचे औचित्य साधून शिरूर नगर परिषदेचे वतीने प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ यांनी सर्व पत्रकार बांधव यांचा सन्मान केला.