बीड/ प्रतिनिधी. मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने बीड शहरातील सीएससी अकॅडमी, शाहूनगर, हनुमान मंदिर रोड ,जाधव हॉस्पिटल समोर दर्पण दिन तसेच 'आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे' वितरण करण्यात येणार आहे.कार्ड साठी घाडगे सर मोफत सहकार्य करणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होईल मराठी पत्रकार परिषदेच्या बीड शहर आणि तालुक्यातील सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन बीड जिल्हाध्यक्ष विशाल साळुंखे यांनी केले आहे. दरवर्षीप्रमाणे देशातील पहिले मराठी दैनिक 'दर्पण' हे बाळशास्त्री जांभेकर यांचे पहिले वृत्तपत्र सुरू झाले. त्यानिमित्ताने दरवर्षी 6 जानेवारी रोजी दर्पण दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने बीड शहरातील शाहूनगर भागातील 'सीएससी अकॅडमी' या ठिकाणी दर्पण दिन व याच ठिकाणी आयुष्यमान भारत कार्डची प्रक्रिया तसेच कार्डचे वितरण केले जाणार आहे . सदस्यांनी आपल्या सोबत आपले आधार कार्ड वर रेशन कार्ड घेऊन यावे .या कार्यक्रमाला बीड तालुका आणि शहरातील मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व सदस्यांनी आणि हितचिंतकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे संभाजीनगर विभागाचे समन्वयक सुभाष चौरे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके,राज्य कार्यकारणी सदस्य विलास डोळसे हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक अभिमन्यू घरत जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संजय हंगे ,जिल्हा उपाध्यक्ष रवी उबाळे,तालुका समन्वयक लक्ष्मण नरनाळे, तालुका निमंत्रक मंगेशनिटुरकर, तालुका अध्यक्ष
दत्ता आजबे कार्याध्यक्ष शेख रेहान कोषाध्यक्ष प्रशांत लहुरीकर, सरचिटणीस चंद्रकांत साळुंके , उपाध्यक्ष दत्ता नरनाळे ,अनिल अष्टपुत्रे यांनी केले आहे.