शिरुर - प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेच्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सुकाणु  समितीने जिल्हा अंमलबजावणी समितीवर नामनिर्देशित अनुभवी तज्ञ व्यक्ती म्हणुन ॲड. धर्मेंद्र खांडरे, विकास जगताप व हरिष परदेशी यांना नामनिर्देशित केले आहे,.

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षते खालिल समितीत एकुण ११ पदाधिकारी, असतील .ॲड.खांडरे यांचा जिल्ह्यातील संपर्क आणि अनुभवाची थेट केंद्रानेच दखल घेतली  आहे .

ॲड . खांडरे हे भाजपाचे  शिरुर लोकसभा संयोजक व महाराष्ट्र प्रदेश विधी आघाडी प्रभारी म्हणुन  कार्यरत आहेत , पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनेत सहभागी करुन घेणार असल्याचे खांडरे  यांनी सांगितले .