सार्वजनिक व्यायाम प्रसारक मंडळ नंदोरी द्वारा आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, उद्घाटन महेशजी झोटिंग पाटील, संजयजी डेहणे उपस्थित होते. यावेळी आयोजन मंडळाच्या वतीने मान्यवरांचे पुष्गगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी मनोगत व्यक्त करत कब्बडी हा मातीतील खेळ आहे. या खेळातून अनेक खेळाडूंनी आपले नाव राष्ट्रीय स्थरावर नेऊन मातीतला खेळ आजही जपत आहे, त्यामुळे देह आणि मन हि जपल्या जाईल असा हितोपदेश दिला. तसेच सार्वजनिक व्यायाम प्रसारक मंडळाचे आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, भाजपचे संजय डेहणे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश वैरागडे, किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत गौळकर, माजी जि.प.सदस्य भिमरावजी झुलझेले, माजी सरपंच सुधीर गोठे, गजानन बोरेकर, डॉ. प्रविण खेळकर, मंडळाचे अध्यक्ष अशोक सुमटकर, सचिव देवनाथजी बोरूटकर, संतोष घोडे, शरद सावरकर, अरुण सावरकर, सचिन हिवरकर, संजय पावडे, नितीन चौधरी, महेश गोठे, सुरेश आडे, मयूर गोठे आदी उपस्थित होते...
नंदोरी येथे भव्य कब्बडी स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्याला राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांची उपस्थिती
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/updates/photos/2024/01/nerity_b084d7647b69136a63875e98f1edd3a7.jpg)