बीड जिल्ह्यातील कलावतांच्या प्रश्नांची वाचा फोडण्यासाठी आता लढणार प्रहार !

 

चेहर्यावरती रंग फासुनी जगणं आमचं कलाकारांचं, माणसांचे जिवन दाखवुन दुखं लपवतो मात्र स्वतहाचं. कलाकार आपल्या समाजाचे आणि मणुष्य जिवनाचे अनेक पैलु कलेच्या माध्यमातून जगत असतो. नाटकाच्या रंगमंचावर तो अनेक जिवन जगत असतांना अनेक पात्र रंगवत आसतो आणि प्रेक्षकांच्या एका टाळीसाठी भुकेला असतो.माणसाचं आयुष्य दाखवता दाखवता त्याचच आयुष्य हरवुन गेलेलं आसतं. खर्या जिवनाच्या रंगमंचावर मात्र तो सतत संकटाच्या वाटेवर चालतांना दिसतो.अनेक समस्यांना तोंड देत देत तो जगाला हसवत असतो आणि त्यांच दुखं विसरायला लावत असतो.परंतु याच कलाकारांच्या दु:खाला दुर करण्यासाठी अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना अनेक वर्षापासून या कलावंताच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या माध्यमातून कलाकारांच्या विविध प्रश्नावर आवाज उठवून त्याची मदत करुन कलेचा वारसा जिवंत रहावा या साठी कार्य केले जाते. बच्चु भाऊ कडु आज उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. एक दबंग आमदार आणि वेळी आक्रमक नेते, जनसामान्याचा अपना भिडु बच्चु कडु अशी ज्यांची ख्याती . याच बच्चु भाऊंची हि अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटना सध्या अखंड महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशातील कलाकारांना उभी करुन त्यांच्या साठी लढत आहे. याच अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेची संपूर्ण महाराष्ट्राची कार्यकारणी काल जाहीर झाली. आणि आपल्या बीडसाठी,अखिल भारतीय चित्रपट संघटना बीड जिल्हाप्रमुख म्हणुन सिनेकलावंत महादेव सवाई ( म्यडी )या़ंची निवड करण्यात आली आहे. महादेव सवाई ( म्यडी) हे नाव बिड जिल्ह्यातील कलावंत क्षेत्रात आवर्जून घेतले जाते.कारण महादेव सवाई उर्फ म्यडी हे गेली अठरा ते विस वर्षापासून रंगभुमी ते सिनेमा चा खडतर आणि यशस्वी प्रवास करुन तावुन सुलाखुन तयार झालेले सशक्त असे अभिनेते आहेत. बघता क्षणी धडकी भरवणारे त्यांचे व्यक्तीमत्व जास्त करुन खलनायकाच्या भुमिका साकारत आजपर्यंत विवीध मालीका , सिनेमा, वेबसिरीज, शाँर्ट फिल्म च्या माध्यमातून आपण बघत आलेलो आहोत. पडदयावर खलनायक जरी जगत आले असले तरी महादेव सवाई( म्यडी) हे व्यक्तीगत आयुष्यात अतिशय शांत संयमी आणि संघटन कौशल्याची जपणुक करनारे आणि गोड स्वभावाचे व्यक्ती आहेत. आपल्या स्वभावामुळे आणि कुणालाही क्षणात आपलेसे करुन बंधुभाव जपणार्या या महादेव सवाई( म्यडी) यांची कलाक्षेत्रातील मेहनत, यश, आणि व्यक्तीमत्व यावरुन अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या बीड जिल्हाअध्यक्ष पदी योग व्यक्तीची निवड केली आणि आता आम्हाला सुध्दा अपना भिडु आणि आमच्या हक्काचा माणूस मिळाला ,अशी भावना आता बीड जिल्ह्यातील कलावंताची झाली आहे. एकांकिका ,नाटक, राज्यनाट्य स्पर्धा, शाँर्ट फिल्म, मराठी व हिंदी मालीका लक्ष्य,तु माझा सांगाती, जयोस्तुते,डायल 100, सावधान इंडिया, टश्नै ईश्क ,क्राईम पेट्रोल, अस्मिता यासारख्या हिंदी व मराठी मालीकांमधुन महादेव सवाई( म्यडी) यांनी अभिनय तर केला आहे, परंतु आगामी हिंदी चित्रपट अलबेला आलम, श्रीकांत बोला या हिंदी सिनेमातुन ते भुमिका करत आहेत. मराठी सिनेमा बायको देता का बायको, ब्लर कँनव्हास, गाव तिथे गावकी भाव तिथे भावकी मधून ते मुख्य खलनायकाच्या रुपात आहेत. महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटच्या फ्रि.. फेअर.. फेअरलेस या जनहितार्थ फिल्म मध्ये सुध्दा महादेव सवाई( म्यडी) यांची गावगुंड पुढारी अशी सशक्त भुमिका आहे . आणि या फिल्म ला केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचा पहीला पुरस्कार मिळाला आहे तसेच फिल्म फेअर अँवार्डसाठी नामांकन सुध्दा मिळालेले आहे. अभिनयासह सिनेमाच्या लेखनाचेही महादेव सवाई ( म्यडी ) हे काम करतात. प्राईम पिक्चर फाईव्ह या नामांकित ओ.टी.टी.प्लँटफार्मवर त्यांची कथा पटकथा संवाद असलेला ब्लर मांईन्ड हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या सह मसाण नावाच्या मराठी चित्रपटाची कथा/ पटकथा/संवाद त्यांनी लिहलेले असुन लवकरच मसाण मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासह भामटा,लुच्चै साले, आणि बहुचर्चित असणारी गाव लय ग्वाड् या मराठी वेबसिजचे ते लिखाण सुध्दा करतात आणि गाव लय् ग्वाड मध्ये संग्राम पाटील नावाची प्रमुख व अतिशय दमदार भुमिका त्यांनी केलेली आहे. कलाक्षेत्रात परीपूर्ण असणारे महादेव सवाई हे सध्या दैनिक विश्वनायक या दैनिकाचे कार्यकारी संपादक असुन, कलाक्षेत्रासह ते पत्रकारिता क्षेत्रात सुध्दा उत्तम कामगिरी बजावत आहेत. महादेव सवाई( म्यडी ) यांची मेहनत व उत्तुंग कामगीरी यामुळेच त्यांची निवड बच्चु भाऊंच्या अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी करण्यात आली आहे.अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. सारंग महाजन चिखली यांनी महादेव सवाई यांची बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड व्हावी म्हणून खास संपर्क साधुन आणि त्यांच्या कार्याची माहिती व दखल घेऊन निवड केली आहे. एकंदरीत आता बीड जिल्ह्यातील तळागाळातील कलावंतांच्या न्याय हक्कासाठी महादेव सवाई( म्यडी) हे प्रहार चित्रपट संघटनेच्या माध्यमातून लढणार आहेत. आणि यामुळे जिल्ह्यातील तळागाळातील कलाक्षेत्रातील कलावंतांना आनंद झाला आहे. कारण बीडकरांना सुध्दा आपल्या हक्काचा भिडु आता मिळाला आहे.

 

प्रहार चित्रपट संघटनेची राज्य कार्यकारणी पुढीलप्रमाणे जाहीर झाली आहे, महाराष्ट्र अध्यक्ष म्हणुन संदीप मोहीते पाटील.महाराष्ट्राचे उपाध्यक्ष:- सारंग महाजन ,राज्य उपाध्यक्ष :- अमित मुळे ,राज्य संपर्क प्रमुख :- संतोष लांडे ,राज्य संपर्क प्रमुख :- तेजस भंगाळे , राज्य संपर्क प्रमुख महीला :- आरती बन्सोडै मँडम ,राज्य संपर्क प्रमुख महीला :- कविता गायकवाड मँडम , अशी राज्याची कार्यकारणी निवड करण्यात आली असुन. महाराष्ट्रातील सर्व जिल्हयांच्या जिल्हाप्रमुख पदाची निवडही करण्यात आली, यामध्ये आपल्या बीड जिल्हयासाठी अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी आता सिने अभिनेते महादेव सवाई ( म्यडी ) हे असणार आहेत.