शिरुर - येथील अविनाश घोगरे यांची  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  शिरूर तालुका संघटक पदी निवड झाली आहे .

यासंदर्भातील  नियुक्तीचे पत्र  जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर , पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते, मनसे शिरूर हवेलीचे तालुकाध्यक्ष तेजस यादव यांच्या हस्ते घोगरे यांना  देण्यात आले  .

घोगरे यांनी यापूर्वी  मनसे चे शहराध्यक्ष व मनविसेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे . मनसेच्या शिरूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या  रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे झालेल्या बैठकीत पक्षाचे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर यांनी  नियुक्तीचे पत्र घोगरे यांना दिले.  पुणे शहर उपाध्यक्ष हेमंत बत्ते,  शिरूर - हवेली चे  तालुकाध्यक्ष  तेजस यादव,  शिरुर आंबेगाव चे तालुकाध्यक्ष  नानासाहेब लांडे, जिल्हा उपाध्यक्ष किरण गव्हाणे, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खेडकर, शिरूर शहर सचिव रवीराज लेंडे आदी यावेळी उपस्थित होते. पक्षसंघटन मजबूत करुन पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे घोगरे यांनी निवडीनंतर सांगितले .