पुणे नगर महामार्गावर कंटेनर व कारचा भीषण अपघात

लहान बालिकेसह एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

( शिक्रापूर प्रतिनिधी ) पुणे नगर महामार्गावर कारेगाव लागत फलके मळा एका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला कार धडकून भीषण अपघात होऊन सुदाम शंकर भोंडवे, सिंधुबाई सुदाम भोंडवे, कार्तिकी अश्विन भोंडवे व आनंदी अश्विन भोंडवे या चौघांचा जागेवर मृत्यू होऊन कार चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

                                     कारेगाव ता. शिरुर येथील पुणे नगर महामार्गावरुन अश्विन भोंडवे हे आई, वडील, पत्नी व लहान मुलीसह त्यांच्या ताब्यातील एम एच १२ ई एम २९७८ हि कार घेऊन चाकण येथे त्यांच्या मेहुण्याच्या लग्नासाठी स्थळ पाहण्यासाठी चाललेले होते, फलकेमळा येथे समोरील कार ला डाव्या बाजूने ओहरटेक करुन पुढे जात असताना रस्त्याचे कडेला उभ्या असलेल्या एम एच ४३ बि जि २७७६ या कंटेनरला भोंडवे यांच्या कारची जोरदार धडक बसली, यावेळी कारचा चेंदामेंदा होत कार मधील सर्वजण गंभीर जखमी झाले, घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस हवालदार विलास आंबेकर, विजय सरजिने, वैभव मोरे, संतोष औटी, ब्रम्हा पोवार, माऊली शिंदे, हेमंत इनामे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले मात्र या अपघातात अश्विन सुदाम भोंडवे वय ३५ वर्षे रा. डोमरी ता. पाटोदा जि. बीड हा कर चालक जखमी झाला असून सुदाम शंकर भोंडवे वय ६५ वर्षे, सिंधुबाई सुदाम भोंडवे वय ५५ वर्षे, कार्तिकी अश्विन भोंडवे वय ३५ वर्षे व आनंदी अश्विन भोंडवे वय अडीच वर्षे सर्व रा. रा. डोमरी ता. पाटोदा जि. बीड यांचा जागीच मृत्यू झाला, घडलेल्या घटनेबाबत अश्विन सुदाम भोंडवे वय ३५ वर्षे रा. डोमरी ता. पाटोदा जि. बीड यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलिसांनी कंटेनर चालक बबलू लहरी चव्हाण रा. कूनगाई खुर्द पोस्ट इटवा थाना पेकोलीया जि. बस्ती उत्तरप्रदेश याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे व पोलीस हवालदार विलास आंबेकर हे करत आहे.