शिरुर : शिरुर नगरपरिषदेच्या ३६ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून भांडारपाल रवींद्र यशवंतराव वारे हे सेवेतून सेवानिवृत्त झाले . रवींद्र वारे यांनी सन १९८७ साली शिरुर नगरपरिषदेत नाके कारकून म्हणून कामास सुरुवात केली. त्यानंतर बांधकाम विभागात , नंतर सभाध्यक्ष व भांडारपाल म्हणून काम केले . येथील राजभोग हॉल मध्ये वारे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी माजी नगराध्यक्षा सुवर्णा लंटाबळे , अलका सरोदे , सुनीता कालेवार , उज्जवला बरमेचा , सुवर्णा लोळगे , लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण माजी नगरसेविका कविता वाटमारे , जिजामाता महिला सहकारी बॅकेच्या उपाध्यक्षा सुरेखा शितोळे , माजी नगसेविका संगीता मल्लाव , सुनीता कुरुंदळे , ज्योती लोखंडे , उज्जवला वारे , माजी नगरसेवक मंगेश खांडरे , राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे , माजी सभापती तुकाराम खोले , पालिकेचे माजी आधिकारी आयूब सय्यद , अंकुश चव्हाण ,अरुण घावटे ,चंद्रकांत पठारे ,अनिल चव्हाण , प्रा. विलास आंबेकर ,सचिन सुडके , स्वच्छता निरीक्षक डी बी बर्गे , विजय भोसले , दत्तात्रेय क्षीरसागर , नंदू गाडे , माजी नगरसेवक दादाभाउ वाखारे , राहूल बाफना , लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष राजेंद्र लोळगे ,मुख्याध्यापक संजय वाघ , डॉ अजय पाटील , सतीजा , मुरलीधर महाजन , अशोक बेंद्रे ,रवींद्र अवचट ,राहूल बाफना , विलास गोसावी , विनोद बोरा , राहुल बाफना अशोक मानमोडे , पठाण सर , डॉ .वाखारे , उषा वेताळ , अनिता धुमाळ ,विलास गोसावी आदी यावेळी उपस्थित होते . याप्रसंगी बोलताना जाकिरखान पठाण म्हणाले की शिरुरच्या जडणघडणीत वारे कुटुंबाचे मोठे योगदान आहे . सेवानिवृत्तीनंतर मना सारखे जगा जीवन जगा असे सांगून आतिशय चांगली सेवा रवींद्र वारे यांनी केल्याचे त्यांनी सांगितले . रवींद्र धनक म्हणाले की आतिशय जबाबदरीने वारे यांनी पालिकेत काम केले .३६ वर्ष अशी प्रदीर्घ सेवा केली. एवढ्या प्रदीर्घ काळ शासकीय काम करणे सोपे नाही . वारे कुटुंबाने सातत्याने समाजात काम केले . माधव सेनेचे रवींद्र सानप यांनी रवींद्र वारे यांनी निवृत्ती नंतर नगरसेवक म्हणून काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली . सत्काराला उत्तर देताना रवींद्र वारे म्हणाले की माजी नगराध्यक्ष रसिकलाल धारीवाल , शहिदखान पठाण , प्रकाश धारीवाल या दिग्गजाच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली .प्रामाणिकपणे व निष्ठेने पालिकेत काम केले .काम करत सर्वानी दिलेल्या सहयोगाबद्दल कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली . यावेळी माजी नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे , माजी नगराध्यक्षा उज्जवला बरमेचा , माजी नगरसेविका रोहिणी बनकर , संतोष दरेकर , शिरुर नगरपरिषदेचे कर्मचारी अमृत भंवर , माजी शिक्षक विठ्ठल पडवळ , माजी शिक्षीका मनिषा मूकूंद वारे ,शिरुर शहर कॉग्रेस आयचे शहराध्यक्ष ॲड किरण आंबेकर , प्राजक्ता दरेकर , माजी मुख्याध्यापक गाडेकर ,मुख्याध्यापक संतोष चव्हाण , शिरुर नगरपरिषदेचे भूषण कडेकर , विजय वारे , निकिता  रवींद्र वारे , यांनी मनोगत व्यक्त केले . स्वागत नोटरी दिलीप वारे व कैलास वारे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा सतीश धुमाळ यांनी तर आभार धनश्री वारे यांनी मानले .