शिरुर - उद्याचा काळात राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार होतील असा विश्वास महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केला . शिरुर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे व हवेलीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांची पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते विशेष सन्मान शिरुर येथे करण्यात आला . यावेळी महिला राष्ट्रवादीच्या राज्य सचिव तृप्ती सरोदे , राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा व पंचायत समितीचा माजी सभापती मोनिका हरगुडे , राष्ट्रवादीचा महिला तालुकाध्यक्ष माजी सभापती आरती भुजबळ , जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष शितोळे , माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे , शहराध्यक्ष शरद कालेवार , महिला राष्ट्रवादी शहराध्यक्ष शृतिका झांबरे , युवक राष्ट्रवादी कॉग्रेसचे अमोल वर्पे , शिरुर शहर युवक अध्यक्ष एजाज बागवान , ॲड पूनम मुत्याळ ,रंजन झांबरे , माजी उपसभापती अविनाश मल्लाव , दौलतराव खेडकर , दादाभाउ लोखंडे , , माजी नगरसेविका रेश्मा लोखंडे , माजी नगरसेविका मनिषा कालेवार आदी उपस्थित होते . माजी आमदार गावडे म्हणाले की लोकांची कामे करण्याची संधी जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी निवड झालेले रवींद्र काळे , दिलीप वाल्हेकर यांना मिळाली आहे . नव्याने पक्ष उभारणीचे काम अजितदादा पवार करीत आहे . ६० वर्ष आपण सक्रिय राजकरणात आहोत . अजितदादा पवार उद्याचा काळात मुख्यमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युवकाची फळी मोठ्या प्रमाणावर पक्षाकडे असून त्याना संधी देवून पक्ष संघटन अधिक मजबूत करावे असे सांगून प्रशासनावर वचक कसा असावा लोकांची कामे मार्गी कशी लावावित हे अजितदादा पवार यांचा कडे पाहून लक्षात येते . शिरुर मधुन खासदार निवडुन आणला ते आता वेगळे बोलतात तुमच्या साठी जीवाचे रान केले असे ही खासदारांचे नाव न घेता ते म्हणाले . रवींद्र काळे म्हणाले पद कोणतेही छोटे नसते कामातून त्या पदाला न्याय देता आला पाहीजे .डिसेंबर अखेर होवून ही घोडगंगा साखर कारखान्याचे यंदा धुराडे पेटले नाही असे ही ते म्हणाले . निष्ठेने पक्षाचे काम केले . माझ्या पिढीला आजितदादा पवार यांचे नेतृत्व आवडते म्हणून अजितदादा पवार यांच्या समवेत गेलो . संघटेनेसाठी झोकून देवून प्रामणिकपणे काम करा . कष्ट घेवून काम करणारे अजितदादा पवार यांचे नेतृत्व आहे . आम्ही कार्यकते छोटे असलो तरी स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत असे ते म्हणाले . दिलीप वाल्हेकर म्हणाले की उपमुख्यमंत्री अजितदादानी पवार यांनी पक्ष संघटनेतील पदाधिकारी यांना ताकद देण्याचे काम केले आहे . संघटनेतील कामाची चूणूक दिल्यास अजितदादा पवार त्या कामाची दखल घेतात .बूथ कमिटी सक्षम करण्याचे आवाहन त्यांनी केले . माजी सभापती आरती भुजबळ म्हणाल्या की लोकसभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जो उमेदवार देतील तो निवडून आणण्यात येईल . सचिव तृप्ती सरोदे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र जगदाळे , शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात , माजी सरपंच पांडुरंग दुर्गे , आदीची मनोगते झाली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच तज्ञिका कर्डिले आभार संतोष शितोळे यांनी मानले .