शिरुर - सोशल मिडियाच्या वापर कसा करावा याबाबत शिस्त व भान असणे गरजेचे असल्याचे सांगून मागील ४ महिन्यात आक्षेपार्ह पोस्ट मेसेज स्टेटस ठेवलेल्या २४ जणांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली .

 मुंबई येथील  मराठा आंदोलन नववर्ष व १ जानेवारी विजयस्तंभ अभिवादन या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या  बैठकीचे प्रशासकीय इमारत हॉल मध्ये आयोजन करण्यात आले होते. .

 यावेळी शिरुर मुस्लिम जमातीचे अध्यक्ष इक्क्बालभाई सौदागर , माजी नगराध्यक्ष नसीम खान ,लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक ,माधव सेनेचे रवींद्र सानप , भाजपा अनूसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव , भाजपा युवा मोर्चाचे उमेश शेळके , आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव , आखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे , शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ॲड . प्रदीप बारवकर ,मनसेचे शहराध्यक्ष ॲड . आदित्य मैड , माजी शहराध्यक्ष अविनाश घोगरे ,भाजपाचे विजय नरके , हुसेन शहा ,मितेश गादीया , मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे , उर्मिला फलके , शैलैजा दुर्गे , वैशाली गायकवाड , मनिषा तरटे , राणी कर्डिले , कॉग्रेस आयच्या प्रियंका बडगर , मनसेच्या डॉ .वैशाली साखरे , आदी उपस्थित होते . जगताप म्हणाले सोशल मिडिया वर पोलीसाचे लक्ष असून आक्षेपार्ह पोस्ट स्टेटस ठेवलेल्या २४ जणांवर मागील ४ महिन्यात कारवाई करण्यात आली  आहे. सोशल मिडिया वर कसे वागावे याचे भान व शिस्त असणे आवश्यक आहे. जबाबदारीने सोशल मिडियावर वागले पाहीजे . शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढविण्यात येईल असे ही ते म्हणाले .. माजी नगरसेवक विनोद भालेराव विजय नरके ,रवींद्र सानप ,उमेश शेळके आदीनी विविध सूचना यावेळी केल्या . आभार राजेंद्र गोपाळे यांनी मानले .