शिरुर - अण्णापूर , ता. शिरुर येथे अण्णापूर ते मलठण रस्त्यावर दोन मोटार सायकलच्या अपघातात बीड जिल्ह्यातील एक जण मृत्युमुखी पडला. योगेश अशोक जाधव वय २४ वर्षे रा. उमापुर ता. गेवराई जि. बीड असे मरण पावलेल्याचे नाव आहे .

   याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार अण्णापूर येथील हॉटेल देवकीनंदन समोर शिरूर ते मलठण रोडवर संभाजी आडे, योगेश जाधव, आण्णासाहेब चव्हाण असे तीघे टि.व्ही.एस. स्टार दुचाकी मो.सा. नं. एम.एच. २३ बी.एफ. ६५७४ वरून शिरूर बाजुकडुन वडनेर बाजुकडे जात असताना  भाउसाहेब नाना ठोंबरे रा. कर्डेलवाडी ता. शिरूर जि. पुणे याने त्याच्या ताब्यातील प्लॅटीना मो.सा.नं. एम.एच. १२ ई.व्ही. ५९६५ ही दुचाकी भरधाव वेगात अचानक मलठण ते शिरूर रोडवर आणुन टि.व्ही.एस. मोटारसायकलीस एम. एच .२३ बी . एफ .६५७४ ला ठोस मारून अपघात केला. दरम्यान यासंदर्भात भाउसाहेब नाना ठोंबरे रा. कर्डेलवाडी ता.शिरूर जि. पुणे याच्याविरुध्द शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे