परळी प्रतिनिधी / दि.१० एकीकडे देश आझादी का अमृत महोत्सव परळी नगर परिषद साजरा करत आहे तर दुसरी कडे शहरातील दलित वस्त्यांमध्ये सुविधांचा अभाव जाणवतोय. कोणत्याही दलित वस्तीमध्ये प्रकाश नाही,अनेक वेळा संबधीत अधिकारी यांना सूचना किंवा लाईट बंद आहे संगितले असता दुसरुस्त करू हा शब्द कानी पडतो मात्र काहीही दुरुस्त होत नाही , शहरातील सर्वात मोठी असलेली सार्वजनिक शांतीवन स्मशान भूमीच्या रस्त्यावरील एकही स्ट्रीट लाईट सुरू नाही, रात्रीचा एखादा व्यक्ती जर मयत झाला तर अंतिम संस्कार हा अंधारात करावा लागत आहे या पेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते ,मात्र नगर परिषदच्या अनेक अधिकाऱ्यांच्या शेतात इतका प्रकाश पहिला मिळेल की असे वाटते आपण शेतात नाही तर शहरात आहोत ,आणि हा सर्व प्रकाश नगर परिषद मधील साहित्याचा आहे म्हणजे जिवंत माणसे रहातात त्या दलित वस्त्या अंधारात दलित लोकांचे जीवन मरण अंधारातच आणि शेतात फक्त मौज मज्जा करण्यासाठी लोकांच्या सुविधांसाठी आणलेले साहित्य शेतात लावले जाते अजून किती अति करणार आहात,महिला शौचालय अनेक दिवसांपासून दुरुस्ती करावी म्हणून मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रार करण्यात आली आहे की महिला शौचालयाचे दरवाजे तुटल्याने महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याची डागडुगी करण्यात यावी मात्र यांकडे सुद्धा दुर्लक्ष असे का होतंय समजत नाही दलित वस्ती असल्याने जाणुन बुजून जातीवाद द्वेष नगर परिषद संबंधित अधिकारी न.प मुख्यधिकारी हे करत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे या द्वेषाचे परिणाम सर्व अधिकारी यांना लवकरच भोगावी लागतील हे निश्चित!
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं