स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस आयोजित

**10 कि.मी. मॅरेथॉन -2022* *

दिनांक 14/08/2022 रविवार रोजी सकाळी 07.00 वाजेला *औरंगाबाद ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे 10 कि.मी. मॅरेथॉन समृध्दी महामार्गावर प्रथम आयोजित करण्यात आली असुन स्टीपिंग स्टोन शाळा, सावंगी टोलनाका च्या पुढे पार्किंग करण्यात असुन येथील समृध्दी महामार्गाच्या पॉईंट वरून स्पर्धेस सुरूवात करण्यात येणार आहे.* 

 *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने आपण या मॅरेथॉन मध्ये आपला उर्स्फुत सहभाग नोंदवू शकता पहिले या पहिले सहभाग नोंदवा.* 

1) स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिनांक 13/08/2022 रोजी दुपारी 03.00 वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय, येथे पोलीस कल्याण शाखेत नाव नोंदणी करावी. नोंदणी करताच तात्काळ स्पर्धेक क्रमांक देण्यात येईल आणि स्पर्धेचे दिवशी तो वापरणे अनिवार्य आहे.

2) सदर स्पर्धीत प्रवेश नि:शुल्क असुन 14 वर्षोवरिल कोणताही व्यक्ती यात सहभाग नोंदवु शकतो.

3) सहभागी सर्व स्पर्धाकांना मेडलसह सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

4) स्पर्धांकांनी दिनांक 14/8/22 रोजी सकाळी 6:30 पर्यंत स्पर्धेच्या स्टार्टिंग पॉईंट ला यावे. ज्या स्पर्धांकांना येणे शक्य नाही त्यांचे करिता 1) पोलीस मुख्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, भारत पेट्रोल पंप जवळ, एन-10 हडको, 2) क्रांती चौक, औरंगाबाद शहर येथे निशुल्क वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. याकरिता नमुद ठिकाणी दिनांक 14/08/22 रोजी सकाळी 05:30 पर्यंत पोहचणे अनिवार्य आहे. येथुन आयोजकांचे वाहनातुन स्टार्टिंग पॉईंट ला सोडण्यात येईल.

5) स्पर्धेच्या स्टार्टिंग पॉईंट येथे अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था निशुल्क करण्यात आली आहे.

6) स्पर्धेत सहभागाचे अनुषंगाने अधिक माहिती करिता कृपया खालिल क्रमांकावर संपर्क साधावा.

   श्री. संजय अहीरे, सहा. पोलीस निरीक्षक, 7972525453

    श्री. प्रविण पंडीत, पोलीस नाईक, 8381060659