माळशिरस शहरातील तरुण अमीर शेख हा महाराष्ट्र राज्यामध्ये पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार यावे व माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर हे आमदार व्हावे यासाठी संकल्प करून माळशिरस येथून अजमेर या ठिकाणी पायी चालत निघाला आहे.
दरम्यान आज बारामती या ठिकाणी पोहोचला असता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी सदिच्छा भेटीदरम्यान त्याला पायी यात्रेस शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर त्याची विचारपूस केली.
माळशिरस ते अजमेर हे सुमारे 1200 किमी चे अंतर 60 दिवस प्रवास करीत तो पायी पूर्ण करणार असून अजमेर या ठिकाणी दर्ग्यावरती प्रार्थना करणार आहे.