शिरुर दिनांक ( वार्ताहर ) अंत्यत शोकाकूल वातावरणात राष्ट्रवादी कॉग्रेस युवक चे ( अजित पवार ) शहराध्यक्ष सागर अशोक पांढरकामे वय ३५ यांच्यावर शिरुरच्या अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . काही दिवसापूर्वी सागर याचा गंभीर असा अपघात झाला होता. त्यात त्याच्या डोक्याला व मेंदुला गंभीर इजा झाली होती .

सागर यांच्या पश्चात आई , पत्नी, एक मुलगी ,बंधू असा परीवार आहे .सागर हे  राष्ट्रवादी कॉग्रेसचे  पदाधिकारी व छत्रपती संभाजी महाराज गणेश मंडळाचे  सक्रिय कार्यकर्ते होते . येथील अमरधाम स्माशनभूमीत शोकाकूल वातावरणात सागर यांच्यावर  अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने युवक व  राजकिय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .

शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड. सुभाष पवार ,पुणे जिल्हा जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र काळे , माधव सेनेचे रवींद्र सानप ,महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शिरुरचे उपाध्यक्ष प्रा . सतीश धुमाळ , नामदेव शिंपी समाज शिरुरचे ॲड .नाना पाटेकर , विवेक बगाडे ,बहुजन मुक्ती पालक संघाचे नाथा पाचर्णे , फुले शाहू आंबेडकर विचार संवर्धन समितीचे रमेश गायकवाड , माजी सरपंच विठ्ठल घावटे ,भाजपाचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमोद जोशी , माजी नगरसेवक दादाभाउ वाखारे , संजय खांडरे ह.भ .प . किरणमहाराज भागवत ,  रुखमीनीबाई भंडारी प्रतिष्ठानचे रमणलाल भंडारी आदीनी श्रध्दांजली वाहिली . यावेळी प्राचार्य डॉ .अमोल शहा , माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर , रवींद्र ढोबळे , नसीम खान , माजी नगराध्यक्षा अलका सरोदे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक मुजफ्फर कुरेशी , माजी नगरसेवक सचिन धाडीवाल , माजी नगरसेवक विनोद भालेराव ,माजी नगरसेवक नीलेश लंटाबळे , विठ्ठल पवार ,प्रवीण दसगुडे ,राष्ट्रवादी कॉग्रेसचे शहराध्यक्ष शरद कालेवार ,नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव , ॲड प्रदीप बारवकर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , माजी नगरसेवक मून्ना उर्फ आबीद शेख , शिरुर शहर नाभिक संघटनेचे माजी शहराध्यक्ष रणजीत गायकवाड , शिवसेनेचे खुशाल गाडे , समस्त सकल मराठा समाज संघ विश्वस्त अविनाश जाधव , हुडको नागरी कृती समितीचे शैलेश जाधव , शिरुर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे, समता परिषद चे किरण बनकर , शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक नितीन बारवकर , शिरुरनामाचे संपादक प्रवीण गायकवाड , निवेदक रावसाहेब चक्रे , नोटरी रवींद्र खांडरे , बिजवंत शिंदे , प्रा .हरि पवार , संतोष कांबळे ,आरपीआयचे शहराध्यक्ष नीलेश जाधव , मनशांती छात्रविद्यालयाचे विनय सपकाळ ,मनसेचे माजी शहरप्रमुख सुशांत कुटे , अविनाश घोगरे , भाजपायुवा मोर्चाचे उमेश शेळके , कॉग्रेस आयच्या प्रियंका बंडगर , माजी उपसरपंच तज्ञिका कर्डिले ,प्रियंका धोत्रे, आदी यावेळी उपस्थित होते . सागर पांढरकामे यांनी अत्यंत कमी वयात स्वकर्तृत्वाने आपले कार्य उभे केले होते. त्याचे अकस्मात जाणे सर्वाना चटका लावून जाणारे असल्याची भावना श्रध्दांजली वाहताना अनेकांनी व्यक्त केली .