व्यापाऱ्याचे पाच लाख रुपये लुटले ; डोणगाव शिवारातील घटना
अबंड तालुक्यातील डोणगाव शिवारातील बाह्य रस्त्यावर चिंचेच्या झाडाखाली अज्ञात दरोडेखोरानी हातात कोयता कुन्हाडीचा धाक दाखवून कापसाच्या व्यापाऱ्या जवळील रोख पाच लाख रुपये तसेच दोन मोबाईल लुटून नेल्याची घटना घडली. व्यापारी अभिमन्यू अर्जुन चव्हाण (रा. शिवगढतांडा आडुळ ता. पैठण) असे कापसाच्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
मागील पंधरा दिवसांपासून त्यांना सतत फोन द्वारे संपर्क साधून आमच्याकडे अडीचशे क्विटल जुना कापूस असून काही पैसे अॅडव्हान्स द्या व बाकीचे पैसे नंतर द्या असे काही जण सांगत होते. कापसाच्या व्यापारी अभिमन्यू चव्हाण हे दुचाकीवर सहकान्यासोबत टाका गावाकडे जात असताना डोणगाव शिवारातील बाह्य रस्त्यावर त्यांच्यावर दरोडेखोरानी कुन्हाड व कोयत्याचा धाक दाखवीत चव्हाण यांना लुटले. या प्रकरणी व्यापारी अभिमन्यू चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस रविंद्र ठाकरे हे करीत आहेत.