शिरुर - माजी राष्ट्रपती ए . पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचनप्रेरणा दिन साजरा केला जातो . या दिनानिमित्त शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विशेष स्न्मान करण्यात आला . शिरुर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक पत्रकार नितीन बारवकर , शिरुर मुद्रक संघटनेचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे , महाराष्ट्र साहित्य परिषद शिरुरचे अध्यक्ष नीलेश खाबिया , मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजीत आंबेकर , शिरुर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल बांडे , शिरुर शहर मरठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रा. .सतीश धुमाळ , बांधकाम व्यवसायिक श्यामसुंदर चिखलीकर दगडुभाउ दसगुडे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृत्तपत्रविक्रेत्याच्या शाल , गुलाबपुष्प व पेन देवून सन्मान करण्यात आला . यावेळी ज्येष्ठ्य वृत्तपत्र विक्रेते महेश शहा प्रदिप चोपड़ा, नंदकुमार कुलकर्णी, बबन चौरे,प्रशांत फुलफगर, आकाश क्षीरसागर, कैलास राऊत, सागर राऊत, संतोष गवळी, शुभम सुबंध, योगेश वाळकीकर, दत्तात्रय धोत्रे, शरद क्षीरसागर, यांच्या सन्मान करण्यात आला . प्रास्तविक प्रा सतीश धुमाळ यांनी केले . मस्जी राष्ट्रपती ए.पी.जी अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला . बदलत्या काळात बदलत चाललेली वाचनसंस्कृती वर त्यांनी भाष्य करीत . वाचन चळवळ सर्वत्र रुजणे आवश्यक असल्याचे सांगुन वाचनाने माणसाचे जीवन समृध्द होत असल्याचे त्यांनी सांगितले . वृत्तपत्र विक्रेते विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले . नितीन बारवकर यांनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागील उद्देश यावेळी स्पष्ट केला उपस्थितांचे स्वागत अभिजीत आंबेकर यांनी केले . सूत्रसंचालन नितीन बारवकर यांनी केले . बाबूराव पाचंगे ,अनिल बांडे व नीलेश खाबिया यांनी मनोगते व्यक्त केले आभार योगेश वाळकीकर यांनी मानले .