शिरूर दिनांक( वार्ताहर) राही प्रतिष्ठान शिरूर यांच्यावतीने काचीआळी येथे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिरााचे आयोजन करण्यात आले होते.

 काचीआळी येथील समाजमंदिरात राही प्रतिष्ठान व मीरा नर्सिंग होम च्या डॉ. सुनीता पोटे यांनी महिलांची मोफत आरोग्य तपासणी व महिलांना शारीरिक व. मानसिक आरोग्या विषयी मार्गदर्शन केले. तसेच सर्व महिलांच्या रक्त तपासणी प्रामुख्याने थायरॉईड, कॅल्शियम, रक्तातील साखर , एचबीएवनसी  या तपासण्या केल्या मोफत केल्या . प्रामुख्याने कॅन्सर साठी केली जाणारी CA 125 ही तपासणीही मोफत करण्यात आली या. अनेक महत्वाच्या तपासण्या  मोफत करण्यात आल्या. याप्रसंगी बचत गटाच्या  ललिता पोळ  , शकीला शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच माजी नगरसेविका कविता वाटमारे ,माजी  नगरसेविका संगीता मल्लाव , आदी  उपस्थित होते .