शिरुर दिनांक ( वार्ताहर ) राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त शिरूर नगरपरिषद, घोडनदी यांच्या वतीने ' १ तारीख १ तास' या स्वच्छतेसाठीचा अभियानात एक तास श्रमदान रविवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता करावे असे आवाहन मुख्याधिकारी स्मिता प्रदीप काळे यांनी केले आहे . काळे यांनी सांगितले की नागरिकांना आवाहन करण्यात येते की गांधी जयंती निमित्ताने दि १ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छता ही सेवा अंतर्गत '१ तारीख १ तास श्रमदान' या अभियानात सहभागी व्हावे. शहरातील मुंबई बाजार ,शिरूर नगरपालिका शाळा क्र. ५ व ७ ,भाजी बाजार,विसर्जन घाट ,फकीर मोहल्ला, शिरूर नगरपालिका शाळा क्र. १ लाटेआळी , सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसर , पंचायत समिती कार्यालय परिसर ,पोलिस स्टेशन कार्यालय परिसर ,तहसील कार्यालय परिसर,गोलेगाव रोड ,जीवन विकास मंदिर शाळा,विद्याधाम प्रशाला ,जलसंपदा विभाग कार्यालय परिसर, शिरूर नगरपालिका शाळा क्र. ३ ,शिरूर नगरपालिका शाळा क्र. ४ व ६ ,रिक्षा स्टैंड (एस . टी स्टॅड जवळ),पोस्ट ऑफिस कार्यालय परिसर ,रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालय परिसर , प्रीतम प्रकाश नगर ,सी. टी. बोरा महाविद्यालय ,सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी या वरील पैकी नागरिकाना जवळ असणा-या ठिकाणी जावून अभियानात सहभागी व्हावे. आपला एक सहभाग आपल्या शहराला स्वच्छ बनवू शकतो. असे सांगून मोठ्या संख्येने नागरिकांनी या अभियानात सहभाही व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी काळे यांनी केले आहे .