शिरुर दिनांक ( वार्ताहर ) येथील व्हीजन इंटरनॅशनल स्कूलच्या गणेशोत्सवात गणेशाची आरती प्रशासकिय क्षेत्रात कार्यरत असणा-या प्रशासकिय आधिकारी व स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्याच्या हस्ते करण्यात आली . येथील व्हीजन इंटरनॅशनल स्कुल शिरुर मध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जात असतो . स्कुल ने तुरटीपासुन बनविण्यात आलेली गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे . छत्तीसगड येथील नगरविकास खात्याचे सचिव डॉ . आय्याज तांबोळी ,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ओएसडी डॉ .सुनील शेळके ,नायब तहसिलदार स्नेहा गिरगोसावी , महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अवघ्या २१ व्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या तेजस चिखलीकर व पूजा पंदरकर , शुटिंग एअररायफल्स क्रीडा प्रकारात राष्ट्रीय पातळीवर निवड झालेले शालेय विद्यार्थी चंद्रकांत सातकर व हर्षल वाळके यासर्वांच्या हस्ते गणेशमुर्तीचे पूजन व आरती करण्यात आली . संस्थेचे अध्यक्ष विकास पोखरणा यांनी सांगितले की पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या भाग म्हणुन येथील व्हीजन इंटरनॅशनल स्कूल शिरुर यांच्या वतीने तुरटीच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असुन पर्यावरण पूरक गणेशोत्सावाचा आधिक प्रसार होण्याचा दृष्टीने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पर्यावरण पूरक गणोशोत्सवात सहभाग वाढावावा याकरिता प्रतिष्ठापने करीता पर्यावरण पूरक गणेशमुर्ती देण्यात आल्या आहेत .ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे , प्रसिध्द उद्योगपती प्रकाश रसिकलाल धारीवाल यांचे गणेश मंडळ असणारे आडत बाजार गणेश मंडळ , शिरुर नगरपरिषद कामगार गणेश मित्र मंडळ , नेत्ररोगतज्ञ डॉ .स्वप्ननील भालेकर ,आदीना या पर्यावरण पूरक गणेश मुर्ती देण्यात आल्या आहेत . सध्या गोल्बल वार्मिग सह हवामान बदलाच्या प्रश्न गंभीर होवू लागला आहे. . विविध प्रकारच्या प्रदूषणाने पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. उद्याच्या पिढीसाठी चांगले पर्यावरण ठेवणे. ही सर्वांची जबाबदारी आहे . मागील दोन वर्षापासुन पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचा भाग म्हणून व्हीजन इंटरनॅशनल स्कूल शिरुर मध्ये तुरटी पासून बनविलेली गणेशमुर्ती बसविली जाते या गणेश मूर्तीचे पाण्यात विसर्जन केल्यावर नदीच्या पाण्याचे प्रदूषण न होता पाणी स्वच्छ होते . पर्यावरण पुरक गणेशोत्सावाचा प्रसार होण्यासाठी व्हीजन इंटरनॅशनल स्कुल शिरुरचा वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पर्यावरण पूरक गणेश मुर्ती देण्यात आल्या आहेत. आधिकधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पोखरणा यांनी केले आहे .आपले पर्यावरण वाचविणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले . यावेळी सुवालाल पोखरणा , समर्थ पॅथालॉजीचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते उदय शिंदे , बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर चिखलीकर गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर यावेळी उपस्थित होते . याप्रसंगी स्वागत प्राचार्या मिस पसक्कीन काशी यांनी केले . सुत्रसंचालन प्रा . सतीश धुमाळ यांनी केले . आभार प्रा अलका बेलोटे यांनी मानले . फोटो ओळी व्हीजन इंटरनॅशनल स्कूलचा येथे पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा केला जात असुन श्री गणेशाची आरती करताना छत्तीसगड राज्याचे नगरविकास खात्याचे सचिव डॉ आय्याज तांबोळी