शिरुर दिनांक ( वार्ताहर ) शिरुर नगरपरिषद स्वच्छता निरीक्षक दत्तात्रेय बर्गे यांना केलेल्या दमदाटीच्या निषेध नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी काळ्या फित लावून केला . दरम्यान शिरुर नगरपरीषदेत झालेल्या दमदाटीच्या नगरपरिषदेतील सर्व आधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रित येवुन या घटनेचा निषेध काळ्या फिती लावून केला . यासंदर्भात मुख्याधिकारी, शिरूर नगरपरिषद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की १५/०९/२०२३ रोजी शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक डी. टी. बर्गे नगरपरिषदेत कार्यालयात कामकाज करत असताना नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता यांच्या दालनात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (म. न. से.) या पक्षाचे काही कार्यकत्यांनी येऊन बर्गे यांना दमबाजी व अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. सदर बाब नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी कामकाज करताना मानसिक दृष्ट्या त्रासदायक असून इतर कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काळी फित लावून निषेध व्यक्त करणार असुन याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी निवदेनात करण्यात आली आहे . यानिवेदनावर प्रशासकिय आधिकारी राहुल पिसाळ , कार्यालयीन अधीक्षक अय्युब सय्यद ,नगर अभियंता पल्लवी खिलारी , भांडारपाल रवींद्र वारे ,संगणक अभियंता रत्नदीप पालके ,लेखाधिकारी पकंज माने ,लेखा परीक्षक मोहन गुरव ,आस्थपना प्रमुख विठ्ठल साळुंके ,लिपीक भूषण कडेकर ,चंद्रकांत पठारे ,उपेंद्र पोटे,अनिल चव्हाण ,काळूराम अस्वले, आदीच्या सह्या आहेत.