शिरुर दिनांक ( वार्ताहर )त्याग व बलिदानातून कॉग्रेस पक्ष उभा राहिला आहे . सर्वांस एकत्र घेवून जाणा-या कॉग्रेस आय हा पक्ष आहे .आगामी निवडणुका मध्ये कॉग्रेस आयचा पाठी मागे ताकद उभी करावी असे आवाहन पुणे जिल्हा कॉग्रेस आयचे खजिनदार महेश ढमढेरे यांनी केले . कॉग्रेस आयच्या वतीने शिरुर परिसरात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध भागातुन ही जनसंवाद यात्रा गेली . यात्रेत पुणे जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा किरण काळभोर, पुणे जिल्हा कॉग्रेस आयचे खजिनदार महेश बापू ढमढेरे ,शिरूर तालुका अध्यक्ष वैभव यादव ,शिरूर तालुका महिला अध्यक्ष प्रियांका बंडगर, शिरूर शहर अध्यक्ष ॲड . किरण आंबेकर ,शिरूर शहर महिला अध्यक्ष संगीता मल्लाव, शिरूर तालुका युवक अध्यक्ष संकेत गवारे, शिरूर तालुका युवती अध्यक्ष राजश्री कांबळे , किसान काँग्रेस तालुका अध्यक्ष रामदास थोरात ,कल्पना पुंडे अनिता काळभोर, फेजल पठाण, अजीम सय्यद ,ज्योती हांडे, त्रिंबक पवार ,आशा जंजाळ, स्वाती वाघमारे तेजस मचाले, अनिल माळशेरे ,आदी सहभागी झाले होते . ढमढेरे यावेळी म्हणाले की सर्वधर्मसमभावाचे तत्व कॉग्रेस आयने जपले आहे. सध्या महागाई व रोजगारी मुळे जनता त्रस्त आहे .जनसंवाद यात्रेच्या माध्यमातुन सामान्य जनतेशी संवाद साधला जात असुन यात्रेस चांगला प्रतिसाद मिळत आहे . फोटो ओळी कॉग्रेस आयच्या वतीने शिरुर शहरात जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते .