ज्याचं त्याला कळतं असतं

ज्याचं त्याला कळत असतं पण तरी मन शांत नसतं. जाणवतो चिखल पायाला तरी चिंब पावसात भिजायचं असतं टचकन टोचतो काटा बोटाला तरी आवडतं मात्र गुलाबच असतं रुतलेली असते देवबाभळी पायात तरी शिखरापर्यंत पोहोचायचंच असतं असतो चंद्र पोर्णिमेचा... तरी डोळं चांदण शोधत असतं उमललेली असते नवीन कळी तरी सुकलेलं फुल मात्र पुस्तकातचं असतं झाली असली सकाळ तरी मन रात्रीतल्या स्वप्नात रमलेलं असतं असतो घरामध्ये लख्ख प्रकाश तरी सूर्यप्रकाशाच्या किरणांवर चालायचं असतं असते उबदार गोधडी अंगावर तरी आईच्या कुशीत झोपायचं असतं सरळ असतो रस्ता तरी पायवाटेकडे पावलांना वळायचं असतं कोसळलेला असतो बुरुज तरी सह्याद्रीच्या रांगांना मात्र झळकायचं असतं खोल असते दरी तरी डोकावून मात्र बघायचं असतं ज्याचं त्याला कळत असतं पण तरी मन शांत नसतं... - 

सप्तमी  क्रांती हरेश पैठणकर

मो - 8329187991