बस नसल्याने विद्यार्थ्यांचे स्थानकांतच बस रोको आंदोलन
पाचोड (विजय चिडे)पाचोड येथे शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी बस नसल्याकारणाने या विद्यार्थ्यांना चक्क बससाठी रास्ता रोको आंदोलन करण्याची गरज पडली असल्याचा प्रकार पाचोड ता.पैठण येथील बसस्थानकांत मंगळवारी (दि.८) रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान करण्यात आले आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की,पाचोड ता.पैठण येथे खेड्यापाड्यातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात मात्र त्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस भेटत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. भोकरवाडी, माळेवाडी, नागेशवाडी,नागेण्याची वाडी, चिंचखेड, पिंपरखेड,कानडगाव,झोडेगाव या गावातील १०० ते १२० पेक्षा अधिक विद्यार्थ्यी पाचोड येथील जवाहर कनिष्ठ महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत असतात.मात्र या विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी बस सुविधा वेळेवर भेटत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरती विपरीत परिणाम होत आहे.
यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाचोडला येणाऱ्या बसेस भोकरवाडी, माळेवाडी, नागेशवाडी,नागेण्याची वाडी, चिंचखेड, पिंपरखेड,कानडगाव,झोडेगाव या ठिकाणी थांबत नाही थांबले तर विद्यार्थ्यांना घेत नाही, काही बसेस या मार्गावर आहे परंतु त्या शाळेच्या वेळेच्या नंतर आहे.विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. मासिक पास काढुनही बस थांबत नसल्यामुळे, विद्यार्थ्यांना खाजगी बसने जादा पैसे मोजून यावे लागत आहे. यामध्ये विशेषत : मुलींचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. मंगळवारी तीनच्या दरम्यान दोन्ही महाविद्यालयातील विद्यार्थी पाचोड बस स्थानकामध्ये बसची वाट पाहत बसले परंतु बस पाच वाजेपर्यंत ही आली नाही त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पाचोड स्थानकामध्येच बसेस अडविल्या. यामुळे एकच गोंधळ उडाला. जोपर्यंत आम्हाच्या शाळेच्या वेळेत आम्हाला कामयस्वरूपी बस देत नाही तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यां पाचोड बसस्थानकातुन एकही बस बाहेर निघून देण्यार नसल्याची भुमिका या विद्यार्थ्यांनी घेतली होती तसेच बस स्थानकाच्या गेटवरच ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका घेतल्यामुळे, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर आग्रा प्रमुखांनी या विद्यार्थ्यांना बस देण्याचे असल्याचे आश्वासन दिल्याने, विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
चौकट-
या आंदोलनाची माहिती पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे यांना भेटल असता त्यांनी तात्काळ तेथील शालेय विद्यार्थ्यांना भेट घेऊन या आंदोलनाची सविस्तर माहिती घेऊन तात्काळ आग्रा प्रमुखांना संपर्क साधून या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी साठी बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली.