शिरूर दिनांक (वार्ताहर) शिवसेनेचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम,खाऊ ,मिठाई फळ याचे वाटप व करून व वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.. त्याच बरोबर राज्यात पुन्हा एकदा सरकार आणण्याचा निर्धार ही शिवसैनिकांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील शासकीय विशेष मुलीच्या शाळेत खाऊ, मिठाई, फळे यांचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर सिद्धीचा पहाड याठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कैलास भोसले,जिल्हा समन्वयक राजेंद्र शिंदे, तालुकाप्रमुख पोपट शेलार, शहरप्रमुख संजय देशमुख, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख शैलजा दुर्गे, संगीता शिंदे, ज्येष्ठ शिवसैनिक खुशाल गाडे, सुनील चौधरी, पप्पू गव्हाणे, माणिक गव्हाणे,उप शहरप्रमुख संतोष पवार, राजेंद्र चोपडा, निखील केदारी, सिद्धेश्वर वनीकरण समितीचे तुषार वेताळ आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शहरप्रमुख संजय देशमुख म्हणाले की शिवसेना ही ८०% समाजकारण करणारी संघटना असून लोकहिताची विविध कामे व्हावी याकरिता सातत्याने आग्रही भूमिका मांडणारी आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व हे कणखर असून कार्यकर्त्यांनी आगामी काळात पुन्हा आपले सरकार आणून उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनविण्यासाठी समर्पित भावनेने काम करावे. तालुका प्रमुख पोपट शेलार यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाद्वारे तालुक्यात साजरा केला जात असल्याचे सांगितले. यावेळी राजेंद्र शिंदे, सुनील चौधरी यांनी ही मनोगते व्यक्त केली. फोटो ओळ शिवसेवापक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उउध्दव ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून शिरूर मध्ये साजरा करण्यात आला.