राष्ट्रवादीचे कार्याध्यक्षपदी विलास शेळके यांची निवड 

पाचोड/

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाची बैठक पार पाडली यात पैठण तालुक्यात कार्याध्यक्षपदी पाचोड येथील विलास शेळके यांची निवड करण्यात आली. पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे, किशोर पाटील, माजी जिलाध्यक्ष सुधाकर सोनवणे, महिला अध्यक्षा छायाताई जंगले, महिला आघाडीच्या सरचिटणीस विनाताई खरे, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण,डॉ ज्ञानेश्वर निळ, विलास चव्हाण यांच्या उपस्थितीत संबंधीतास नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी कौसर पटेल, मुस्तफा पठाण, बिलाल पठाण, दत्ता लोहगळे, शेषनारायण तांगडे, अनिल हजारे, शेखर देशमुख, राजुभाई रहमान शेख , बब्ब फुलारी,पिंटू चिंतामणी,आबासाहेब भुमरे , प्रभाकर भुमरे आदी उपस्थित होते .